समय रैनाचा 'इंडियाज गॉट लॅटेन्ट' कार्यक्रम अडचणीत, थेट पोलिसात तक्रार दाखल; नेमका आक्षेप कशावर?
Samay Raina : इंडियाज गॉट लॅटेन्ट या शोमुळे देशभरात चर्चेत असलेल्या समय रैनाच्या अडचणी आता वाढल्या आहेत. इंडियाज गॉट लॅटेन्ट या शोमुळेच ती अडचणीत आली आहे.

FIR Against India's Got Latent Contestant: इंडियाज गॉट लॅटेन्ट या शोमुळे समय रैना संपूर्ण देशभरात चर्चेत आला. सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा असते. त्याच्या या शोला यूट्यूबवर लाखोंनी व्ह्यूज असतात. विशेष म्हणजे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर अगदी कमी काळात तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. मात्र आता समय रैना (Samay Raina) हा इंडियाच गॉट लॅटेन्ट या शोमुळे अडचणीत सापडला आहे. एका व्यक्तीने या शोमध्ये करण्यात आलेल्या एका वक्तव्यावर आक्षेप घेत थेट गुन्हा दाखल केला आहे.
समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार समय रैनाच्या इंडियाज गॉट लॅटेन्ट या शोमध्ये अरुणाचल प्रदेशमधील एका मुलीने सहभाग घेतला होता. या मुलीचे नाव जेस्सी नवाम असे आहे. या मुलीने शोमध्ये अरुणाचल प्रदेशबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याचा दावा पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. जेस्सी नवाम हिने विनोदाचा भाग म्हणून अरुणाचल प्रदेशबाबत काही टिप्पणी केली होती. त्या विनोदामुळे शोमध्ये चांगलाच हशा पिकला होता. त्यानंतर समय रैनाने त्या मुलीला सध्या कुत्र्याचे मांस खाल्ले आहेस का? असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर म्हमून मी तर अद्याप खाल्लेले नाही. मात्र अरुणाचल प्रदेशचे लोक कुत्र्याचे मांस खातात, असे विधान केले. विशेष म्हणजे या तरुणीने आपल्या मित्रांचा उल्लेख करत ते कुत्र्याचे मांस खातात, असेही सांगितले. तिच्या याच विधानावर आता आक्षेप घेतला जात आहे.
Instagram वर ही पोस्ट पहा
शोवर नेमका काय आक्षेप घेण्यात येत आहे?
समय रैनाचा हा शो यूट्यूबवर आल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या लोकांनी नाराजी जाहीर केली आहे. अरुणाचल प्रदेशमधील अरमान राम वेली बाखा नावाच्या एका व्यक्तीने तर थेट पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला आहे. या तक्रारीनुसार जेस्सी नवाम हिने अरुणाचल प्रदेशच्या मूलनिवासींबाबत अपमानास्पद टिप्पणी केली आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत "जेस्सी नवाम यांनी जे केलंय, ते भविष्यात कोणीही करू नये यासाठी या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करावी," अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही तक्रार 31 जानेवारीची असल्याचं म्हटलं जातंय. ईटानगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर समय रैनाच्या इंडियाच गॉट लॅटेन्ट शोमधील कोणत्याही पॅनेलिस्टने यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
हेही वाचा :
लाखात एक, दिसते सुरेख! अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज; शरारा घालून दिसतेय खास!























