एक्स्प्लोर

#MeToo : दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप

दुसरीकडे आपल्यावर करण्यात आलेले आरोप अतिशय खोटे असल्याचे राजकुमार हिरानी यांनी म्हटले आहे. हे बदनामीसाठी आणि खोडसाळपणा म्हणून करण्यात आले असून यांच्या पूर्ण चौकशीसाठी मी तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरु केलेल्या #Metoo वादळाच्या तडाख्यात आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी सापडले आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स, पीके आणि संजूसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मार्च ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. हे आरोप एका मेलद्वारे करण्यात आले असून संबंधित महिलेने हिरानी यांच्याबरोबरच दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांनाही हा मेल पाठवला आहे. ‘संजू’ सिनेमाची सहायक दिग्दर्शक असलेल्या या महिलेने  हिरानी यांनी घरी आणि ऑफिसमध्ये लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप मेलद्वारे केला आहे. मात्र हिराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीसाठी देखील तयार असल्याचे हिरानी यांनी म्हटले आहे. या महिलेने चित्रपट समिक्षिका अनुपमा चोप्रा, पटकथा लेखक अभिजित जोशी आणि विधू विनोद यांची बहिण शेली चोप्रा यांनाही हा आरोपांचा मेल पाठवला आहे. हिरानी यांनी आपल्यावर अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी माझे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. आपण या शोषणाला विरोध केल्यानंतर आपल्याकडून चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकीही हिरानी यांनी दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आपल्याकडे असणारे काम आपल्याला घालवायचे नसल्याने आपण त्यावेळी आवाज उठवला नाही असेही या महिलेने म्हटले आहे. एका रात्री माझ्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीमुळे मी पूर्णपणे खचून गेले. हे पुढील सहा महिने सुरु होते, असे या महिलेने म्हटले आहे. दुसरीकडे आपल्यावर करण्यात आलेले आरोप अतिशय खोटे असल्याचे राजकुमार हिरानी यांनी म्हटले आहे. हे बदनामीसाठी आणि खोडसाळपणा म्हणून करण्यात आले असून यांच्या पूर्ण चौकशीसाठी मी तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget