एक्स्प्लोर
Advertisement
सलमान खानवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील मुजफ्फरपूर कोर्टाने दिले आहेत.
मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील मुजफ्फरपूर कोर्टाने दिले आहेत.
सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीचा नवा रोमँटिक सिनेमा ‘लवरात्री’ हा नवरात्री उत्सवाच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र धार्मिक भावना दुखावल्याचं कारण देत, सिनेमाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळेच कोर्टाने सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर मिठनापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लवरात्री या आगामी सिनेमाच्या नावावरुन हा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे सुधीर ओझा यांनी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीच्या लवरात्री या सिनेमाशी संबंधित अन्य 76 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. यामध्ये सलमान खान, लीड रोलमध्ये असलेला आयुष शर्मा, वरीना हुसेन, अंशुमान जा, राम कपूर यांची नावं आहेत.
या सिनेमामुळे धार्मिक भावना दुखावत असून, समाजिक सौहार्द बिघडत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
दरम्यान, लवस्टोरी या सिनेमात गुजरातमधील एक प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात आयुष शर्मा आणि वरीना हुसेन यांची प्रेमकहाणी बहरत जात असल्याचं या सिनेमात दाखवलं आहे. हा सिनेमा 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
या सिनेमाची निर्मिती सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीने केली आहे, तर दिग्दर्शन अभिराज मिनावालाने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement