एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

'टकाटक 2'चा धमाकेदार टीझर रसिकांच्या भेटीला

काही सिनेमे केवळ बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे 'टकाटक'. पहिल्या सिनेमाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्यानं 'टकाटक 2'च्या रूपात या सिनेमाचा पुढील भाग 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरनंतर आता 'टकाटक 2'चा टीझरही लाँच करण्यात आला आहे.

'संगीत देवबाभळी'चा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश

 भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या संगीत देवबाभळी या मराठी रंगभूमीवरील नाटकाचा या वर्षीपासून मुंबई विद्यापीठीच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या मराठी विषयात समावेश करण्यात आला आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्राजक्त देशमुखने सांभाळली आहे. या नाटकाचा बी ए अभ्यासक्रमात समावेश होणं ही मराठी नाट्यसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे. 
 
महेश टिळेकर देणार निराधार महिलेच्या डोक्यावर छप्पर

पुण्यातील अप्पर इंदिरा नगरमधील ओटा वसाहतीत राहणाऱ्या 65 वर्षांच्या रंभा पवार यांच्यावर नियतीने बालपणापासूनच आघात केले. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठी असलेल्या संघर्षामुळे आता उतार वयात त्या हतबल झालेल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात रंभा बाईंचा एक डोळा कायमचा निकामी झाला. घरच्या गरिबीमुळे काबाडकष्ट करत आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर वर्षभरात पतीने त्यांना वाऱ्यावर सोडून देत दुसरे लग्न केले. एकट्या पडलेल्या रंभा पवार माहेरी आश्रयाला आल्या. आई वडिलांचा आणि भावाचा आधार मिळाला तरी दारोदार जाऊन जुने कपडे गोळा करून त्या बदली छोटी भांडी देण्याचा व्यवसाय करू लागल्या.एकेदिवशी डोक्यावर ओझं घेऊन ट्रेनमध्ये चढत असताना पाय घसरून त्या खाली पडल्या सुदैवानं जीव वाचला पण शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे 3 वर्ष त्या चालू शकल्या नाहीत. त्यावेळी भावानं त्यांना खूप जपलं. 

'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू

'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळत असते. 2016 मध्ये कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो'ला सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 

जस्टिन बीबरची 'वर्ल्ड टूर'

प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर यानं काही दिवसांपूर्वी त्याला झालेल्या ‘रामसे हंट सिंड्रोम’या आजारची माहिती चाहत्यांना दिली होती. या आजारामुळे जस्टिनला त्याचे अनेक शो रद्द करावे लागले. आता त्याच्या 'जस्टिस वर्ल्ड टूर' ला पुन्हा सुरुवात होणार आहे. या टूरमध्ये इंडिया टूरचा देखील समावेश होणार आहे. 

'नवा गडी नवा राज्य' मालिकेतून पल्लवी पाटील करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. झी मराठीवर लवकरच 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका सुरू होत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. या मालिकेद्वारे पल्लवी पाटील छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 

'फाईल नंबर - 498 अ' च्या शूटिंगला सुरुवात

"तुझ्यात जीव रंगला" या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे.  'फाईल नंबर -  498  अ" या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत करीनानं केला गौप्यस्फोट

 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी करीना ही पती सैफ अली खान आणि  तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली होती. करीना सोशल मीडियावर लंडन ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. करीना आणि सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे आता करीना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला करीनानं उत्तर दिलं आहे. 

'खजाना' गझल महोत्सवात गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना दिली जाणार श्रद्धांजली

'खजाना' हा गझल महोत्सव गेल्या 21 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षीदेखील हा गझल महोत्सव होणार आहे. या महोत्सवात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर होणार लाँच

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडा हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला ‘लायगर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गुरुवारी (21 जुलै) संध्याकाळी लायगर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला चित्रपटाच्या टीमसोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता उपस्थित राहणार आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget