एक्स्प्लोर
हार्ट अटॅकनंतर हेअर ड्रेसर जावेद हबीब यांची प्रकृती स्थिर
कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी जावेद हबीब यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई : सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. हरियाणातील यमुनागर इथे एका हेअर सलूनच्या उद्घाटनप्रसंगी हा प्रकार घडला.
कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी जावेद हबीब यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सलूनच्या उद्घाटनानंतर त्यांनी एकाचा हेअर कटही केला. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार होते. पत्रकार परिषदेची तयारी सुरु असताना त्यांच्या छातीत जोरदार कळ आली. त्यांनी शहरातील चांगल्या हृदयाच्या डॉक्टरची विचारणा केली. परंतु उत्तर मिळण्याआधीच ते जमिनीवर कोसळले.
या घटनेनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ झाला. त्यांना तातडीने सचदेवा रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement