मुंबई : सध्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून बॉलिवूड विश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. साधारणपणे दीड वर्ष सुशांत सिंह राजपूतच्या घरी काम करणाऱ्या सुशांतच्या नोकराने काही बाबींचा खुलासा केला आहे. नीरज सिंह सुशांतच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत त्याच्या घरी काम करत होता. सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं? याचा त्याने एबीपी न्यूजसमोर खुलासा केला आहे.


सुशांत त्या दिवशी दरवाजा उघडत नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडल्यानंतर सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. आत्महत्येपूर्वी सुशांत ज्यावेळी आपल्या खोलीतून बाहेर आला होता. त्यावेळी नीरजने त्याला थंड पाणी प्यायला दिले होते. ही सुशांतसोबत त्याची शेवटची भेट होती. त्यानंतर सुशांत खोलीत गेल्यापासून खोलीचं दार तोडेपर्यंतचा घटनाक्रम नीरजने सविस्तर सांगितला.


नीरजने सांगितलं की, एक दिवस अगोदर म्हणजेच, 13 जून रोजी घरात कोणतीच पार्टी झाली नव्हती. घरातील सर्वच नोकर घरातच होते. 8 जून रोजी रिया ज्यावेळी घर सोडून गेली, त्यावेळी कोणतंही भांडण झाल्याचं नीरजने पाहिलं नसल्याचं सांगितलं. नीरजचं म्हणणं आहे की, लहान-लहान गोष्टी कपल्समध्ये घडतच असतात. यात काही मोठी गोष्ट नाही. दीड वर्षांपर्यंत त्या दोघांमध्ये कोणतंही भांडण झाल्याचं मी पाहिलं नाही.


नीरजने सांगितलं की, रिया घर सोडून जात होती तेव्हा सुशांत त्याच्या खोलीतच होता आणि रिया कपड्यांनी भरलेली बॅग घेऊन गेली होती. लॅपटॉप आणि मेडिकल फाईल्सबाबत कोणतीही माहिती नाही. सुशांत आणि रिया एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. सुशांत प्रत्येक गोष्ट रियाला विचारत असे आणि तिच्यावरच अवलंबून होता. मेन्टेनन्स आणि फायनॅशिअल कंट्रोलही रियाकडेच होता.


सुशांतची ट्रिटमेंट सुरु होती, त्यावेळी काही दिवसांसाठी सुशांत रियाच्या घरी राहिला होता. रियाच घरासंदर्भातील सर्व निर्णय घेत होती, असंही नीरजने यावेळी बोलताना सांगतिलं. तसेच यापूर्वी रियाने काही नोकरांना कामावरून काढून टाकलं होतं. युरोप टूरवरून परतल्यानंतर सुशांतची तब्येत बिघडली होती. नीरजला आणि घरातील इतर स्टाफला सुशांतच्या डिप्रेशनबाबत काहीच माहिती नव्हती. रिया सुशांतवर उपचार करत होती. तसेच त्याची औषधंही तिच देत असे, असंही नीरजने सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या :