Vivek Agnihotri Birthday: कश्मीर फाईल्स, द वॅक्सिन वॉर सिनेमांनी बॉलिवूडला हादवरून टाकलं, विवेक अग्नीहोत्री किती कमवताे माहितीये?
बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला करणाऱ्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा दिग्दगर्शक विवेक अग्निहोत्री हा कायमच या ना त्या कारणानं चर्चेत असतो.
Vivek Agnihotri Birthday: बॉलिवूडमध्ये द कश्मीर फाईल्स, केरला स्टोरी अशा कित्येक फिल्म्स रिलिज झाल्या. ज्या एकीकडे कॉन्ट्रोवर्शियल तर ठरल्याच पण बॉलिवूडलाही या चित्रपटांनी हादरवून टाकलं. प्रोपोगंडा फिल्म म्हणूनही अनेकांनी या चित्रपटांकडे पाहिलं. बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला करणाऱ्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा दिग्दगर्शक विवेक अग्निहोत्री हा कायमच या ना त्या कारणानं चर्चेत असतो. आज विवेक आपला ५१ वाढदिवस साजरा करत आहे.
जाहिरात, चित्रपटांपासून सुरुवात
विवेक अग्निहोत्री हा आता बॉलीवूडच्या सर्वात कॉन्ट्रोवर्शिअल दिग्दर्शक निर्मात्यांपैकी असला तरी त्यानं त्याच्या करियरची सुरुवात जाहिरातींपासून केली. नंतर तो मुंबईला जाऊन फिल्ममेकर बनला. त्याआधी त्यानं त्याचं नशीब टीव्ही मालिकांमध्येही आजमावलं. एका जाहिरात एजन्सीमध्ये अभिनेत्री पल्लवी जोशी आणि त्याची भेट झाली.आणि काही वर्षांनी लग्न झाले.
द कश्मीर फाईल्सने दिली लोकप्रीयता
द कश्मीर फाईल्स, द वॅक्सिन वॉर अशा बहुतांश चित्रपटांची देशभरात चर्चा झाली. विवेक अग्निहोत्रीने 2005 मध्ये 'चॉकलेट' चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, पण 'द काश्मीर फाईल्स' मधून त्यांना ओळख मिळाली. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रचंड नफा कमावला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक विवेक अग्निहोत्रीला पल्लवी जोशीचा नवरा म्हणून ओळखत होते, पण आता सगळे त्याला त्याच्या नावाने आणि 'द काश्मीर फाइल्स'ने ओळखतात.
या कॉन्ट्रोवर्शियल वादात सापडला विवेक
विवेक अग्नीहोत्री अनेक खळबळजनक वक्तव्य करत कायम चर्चेत असल्याचं दिसतं. कोलकत्ता रेप केस असो की कश्मीरी पंडीतांवर केलेले वक्तव्य. विवेकच्या वक्तव्याची दखल सिनेसृष्टीतल्या अनेक जाणकारांना घ्यावी लागते.आता नुकतेच त्याने फ्रिडम ॲट मिडनाईट या वेबसिरिजवर धार्मिक बाजू लपवल्याचा आरोप या वेबसिरिजच्या दिग्दर्शनावर केलाय.
किती कमवतो हा फिल्ममेकर?
काही दिवसांपासून कमर्शिअर फिल्म्सपासून विवेक लांब असल्याचं सांगितलं जातं. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार विवेककडे एकूण ४० कौटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जातं. विवेकला त्याच्या जबरदस्त कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.