Delhi Weather Update : मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
Delhi Weather Update : मिंटो रोड, मोती बाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल-1 च्या रस्त्यांवर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 100 हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला.

Delhi Weather Update : राजधानी दिल्लीत आज (25 मे) वादळासह मुसळधार पाऊस पडला. मिंटो रोड, मोती बाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल-1 च्या रस्त्यांवर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 100 हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला. दिल्ली विमानतळाने सांगितले की रात्री साडे अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत 49 उड्डाणे वळवण्यात आली. आता परिस्थिती सामान्य आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये काल रात्री वादळ आणि पावसामुळे एसीपी कार्यालयातील खोलीचे छत कोसळले. यात उपनिरीक्षक (एसआय) वीरेंद्र कुमार मिश्रा गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
VIDEO | Delhi rains: The road leading Terminal 3 of IGI Airport is still waterlogged causing inconvenience to travellers. #Delhi #DelhiWeather #Delhirains pic.twitter.com/01O0Q018Dv
— Press Trust of India (@PTI_News) May 25, 2025
दरम्यान, काल देशात मान्सून दाखल झाला आहे. तो त्याच्या नियोजित वेळेच्या आठ दिवस आधी केरळमध्ये पोहोचला. हवामान खात्याने आज देशातील 21 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. याशिवाय, उत्तराखंडमध्ये गारपीट आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ-उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Noida last night around 2:30am. #RainAlert #rain #delhirain #DelhiNCR #delhiweather pic.twitter.com/4uCMnpwoTD
— Shweta Jha (@shwetajhaanchor) May 25, 2025
हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 60 ते 80 किमी वेगाने वारे वाहणे, मुसळधार पाऊस, वादळाचा इशारा दिला होता. याअंतर्गत, दिल्ली-एनसीआरमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. अलर्ट जारी केल्यानंतर काही तासांतच दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या अनेक भागात पाणी साचले आहे.
#WATCH | A car submerged as heavy rainfall causes severe waterlogging in parts of Delhi.
— ANI (@ANI) May 24, 2025
(Visuals from Minto Road) pic.twitter.com/HmRv09CEpV
इतर महत्वाच्या बातम्या























