Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Jul 2023 03:59 PM
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahparivar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण हळूहळू मालिकेचं कथानक लांबवलं गेलं आणि प्रेक्षक नाराज झाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन ते शाहरुख खान; तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींची पहिली कमाई किती? जाणून घ्या...

Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक कलाकार आज सेलिब्रिटी असले तरी हा पल्ला गाठण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला आहे. अनेक अडचणींचा सामना करत ते आज यशस्वी झाले आहेत. यात बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे. 


Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन ते शाहरुख खान; तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींची पहिली कमाई किती? जाणून घ्या...

Surinder Shinda Passes Away: पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Surinder Shinda Passes Away: प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा  (Surinder Shinda) यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांनी बुधवारी पहाटे लुधियानाच्या DMCH रुग्णालयात  वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुरिंदर हे गेले काही दिवस आजारी होते. सुरिंदर यांच्या निधनामुळे पंजाबी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक जण सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली वाहात आहेत.





Samantha Ruth Prabhu : अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्यानंतर समंथा काय करतेय? अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा

Samantha Ruth Prabhu New haircut : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे समंथाचे चाहते नाराज झाले होते. पण अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असला तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चेत आहे.

Aadesh Bandekar Suchitra Bandekar : 500 रुपयांचं खोटं मंगळसूत्र, पळून जाऊन लग्न; आदेश-सुचित्रा बांदेकरांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी जाणून घ्या...

Aadesh Bandekar Suchitra Bandekar Lovestory : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. 


Aadesh Bandekar Suchitra Bandekar : 500 रुपयांचं खोटं मंगळसूत्र, पळून जाऊन लग्न; आदेश-सुचित्रा बांदेकरांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी जाणून घ्या...

Tamannaah Bhatia On Diamond Ring: तमन्नाकडे आहे जगातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा? अभिनेत्रीनं सांगितलं व्हायरल फोटोमागील सत्य

Tamannaah Bhatia On Diamond Ring: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये  आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली आहे. तमन्ना भाटिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे  देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा डायमंड रिंग फ्लाँट करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु झाली की, तमन्नाकडे जगातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे, ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे. राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला हिने हा हिरा तमन्नाला भेट म्हणून दिला आहे, असंही सोशल मीडियावर म्हटलं जात होत.आता तमन्नानं या डायमंड रिंगसोबतच्या व्हायरल फोटोमागील सत्य सांगितलं आहे.



Ved World Television Premiere : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चा होणार वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर

Ved World Television Premiere : 'ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही' असं म्हणत 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमागृहात या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर होणार आहे. येत्या 20 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता प्रेक्षक हा सिनेमा घरबसल्या पाहू शकतात. आता छोट्या पडद्यावर हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Kargil Vijay Diwas : 'एलओसी कारगिल' ते 'शेरशाह'; कारगिल युद्धावर आधारित 'हे' सिनेमे आज नक्की पाहा...

Kargil Vijay Diwas Movies : 'कारगिल युद्ध' (Kargil War) हे भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे युद्ध ठरले. आजच्या दिवशी 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 1999 रोजी भारताने हे युद्ध जिंकले तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'कारगिल विजय दिवस' (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. या युद्धात 500 पेक्षा अधिक भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. कारगिल युद्धाचा थरार अनेक बॉलिवूड सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. यात 'एलओसी कारगिल' (LOC: Kargil) ते 'शेरशाह' (Shershaah) अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. आज जाणून घ्या अशाच सिनेमांबद्दल...


Kargil Vijay Diwas : 'एलओसी कारगिल' ते 'शेरशाह'; कारगिल युद्धावर आधारित 'हे' सिनेमे आज नक्की पाहा...

Kamal Haasan : कमल हासनच्या 'Indian 2'चा रिलीजआधीच धमाका; 200 कोटींमध्ये विकले ओटीटी राइट्स

Kamal Haasan : अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) सध्या 'इंडियन 2' (Indian 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाचा जलवा पाहायला मिळाला आहे. रिलीजआधीच 200 कोटींमध्ये या सिनेमाचे ओटीटी राइट्स (OTT Rights) विकले गेले आहेत. 


Kamal Haasan : कमल हासनच्या 'Indian 2'चा रिलीजआधीच धमाका; 200 कोटींमध्ये विकले ओटीटी राइट्स

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Subhedar : गड आला पण... दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट


Subhedar Movie New Poster Out : 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या सिनेमात अजय पुरकर (Ajay Purkar) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 
Dream Girl 2 Poster:  ड्रीम गर्ल-2 मधील आयुष्मानचा फर्स्ट लूक रिलीज; पूजाच्या सौंदर्यनं वेधलं लक्ष


Dream Girl 2 Poster:  अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान हा त्याच्या ड्रीम गर्ल-2 या चित्रपटाचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. या व्हिडीओमध्ये पूजाचा आवाज ऐकू येत होता. पण आता ड्रीम गर्ल-2 मधील पूजाचा लूक आयुष्माननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. पूजाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटामध्ये आयुष्मान हा डबल रोल साकारणार आहे. आयुष्माननं शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्मान हा पूजाच्या लूकमध्ये दिसत आहे. आयुष्माननं शेअर केलेल्या फोटोमध्ये पूजा ही लिपस्टिक लावताना दिसत आहे तर आरशामध्ये आयुष्मान लिपस्टिक घेऊन उभा असलेला दिसत आहे.  या फोटोला आयुष्माननं कॅप्शन दिलं, 'ही तर फक्त पहिली झलक आहे.' आयुष्मान शेअर केलेल्या या पूजाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'चं नवं पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिली माहिती


Kaun Banega Crorepati : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानात भर करणारा कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) होय. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचे महानायक आणि 'कौन बनेगा करोडपती'चे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कौन बनेगा करोडपती 15'ची (Kaun Banega Crorepati) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.