Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांच्या सेनेने वक्फ विधेयकावरून केलेल्या विरोधाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेने सातत्याने लांगूलचालनाची भूमिका घेतलेली आहे .केवळ गैरसमजाने आणि मतांच्या लाचारीकरता अशा प्रकारे जर या बिलाचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहतेय . असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय. केवळ एकाच समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती तीच लांगुलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली , हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे . असंही ते म्हणाले . (Waqf Board)
दिल्लीत 24 जानेवारी रोजी जेपीसीच्या बैठकीत विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर बुधवारी (29 जानेवारी) संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने ( JPC )वक्त दुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली .या विधेयकामध्ये विरोधी खासदारांकडून सुचवण्यात आलेल्या सर्व सूचनांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने तसेच केवळ सत्ताधाऱ्यांचे बदल या समितीने स्वीकारले असल्याने विरोधकांकडून मोठा विरोध या विधेयकाला होत आहे .
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने लांगुलचालनाची भूमिका घेतलेली आहे .केवळ एकाच समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती तीच लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली , हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे . कारण वक्फ बोर्डाचे बिल हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही . मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही . तर या ठिकाणी वक्फच्या माध्यमातून जो गैरकारभार चाललाय तो संपला पाहिजे म्हणून हे विधेयक आणलेलं आहे . अशा परिस्थितीमध्ये केवळ गैरसमजाने आणि मतांच्या लाचारीकरता अशा प्रकारे जर या बिलाचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहतेय . त्याला दिसतंय कशाप्रकारे ते लांगुलचालन करतायेत . हे सगळेच लक्षात आलेलं आहे .असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .
विरोधकांची टीका नेमकी काय ?
जेपीसीने स्विकारलेल्या दुरुस्त्या या संविधान विरोधी आहेत .वक्त मंडळावर निवडणुकीद्वारे सदस्यांची नेमणूक होत असे .आता निवडणूकच रद्द केले जाणार आहे असा आक्षेप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला होता .शिवाय एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी काँग्रेसचे नासिक हुसेन यांनीही हा अहवाल केंद्र सरकारच्या मर्जीनुसार तयार करण्यात आल्याचा आरोप केला होता .
हेही वाचा: