Entertainment News Live Updates 28 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी आणि अभिनयच्या प्रेमाला 'रंग लागला'
'मन कस्तुरी रे'चा (Mann Kasturi Re) जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील 'रंग लागला' (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनयमध्ये नव्यानं हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं दिसत आहे. कॉलेजमधील बहरत जाणारं प्रेम, धमाल या गाण्यामध्ये दिसून येतेय. शोर यांनी या गाण्याला संगीत, शब्दबद्ध केले असून आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून अनुभवता येत आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची क्रेझ कायम; मुंबईतील ज्यूस सेंटरमध्ये दिसला पुष्पा फिव्हर
'पुष्पा : द राईस' (Pushpa The Rise) या सुपरहिट चित्रपटाने सर्वांना वेड लावले. यामध्येच 'पुष्पा'स्टार अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये भर पडली आहे मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची. बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी, अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता असून त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेय सादर केली आहेत. अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि फोटो असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून त्यावर ग्राहकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शाही थाट, शोभून दिसतोय जोडा खास; साऊथ सुपरस्टार अडकला लग्नाच्या बेडीत
Harish Kalyan First Wedding Photo : दाक्षिणात्य ( Tollywood ) चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ( South Actor ) अभिनेता हरिश कल्याणने ( Harish Kalyan ) लग्नगाठ बांधली आहे. 'काधली' चित्रपट फेम ( Kaadhali Movie ) अभिनेता हरीश कल्याण नुकताच नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासमोर पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे. हरिश आणि नर्मदाच्या लग्नाने सुंदर फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता हरिश कल्याण आणि नर्मदा पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक कपड्यामध्ये फारच सुंदर दिसत आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
Pushpa 2 : 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लुक आऊट
Allu Arjun First Look From Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandana) 'पुष्पा' (Pushpa) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लुक समोर आला आहे.
View this post on Instagram
Godavari : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'गोदावरी'चा ट्रेलर लॉंच
Devendra Fadnavis On Godavari Movie : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकताच 'गोदावरी' (Godavari) सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले," नद्या जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आम्ही आता नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबवली आहे".
LIVE | Godavari Marathi Movie trailer launch | Mumbai : गोदावरी चित्रपट ट्रेलर लॉंच #JitendraJoshi #GodavariTeaser #Marathifilm #river #movie #marathi #OfficialTrailer @jiostudios https://t.co/GVB0kBcQW5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2022
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच लेकीसोबत येणार भारतात
Priyanka Chopra comes back to India : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. लग्नानंतर प्रियांका नवऱ्यासोबत म्हणजेच निक जोनससह लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. आता तीन वर्षानंतर प्रियांका आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे.
Tiger Shroff : शूटिंगदरम्यान अॅक्शन स्टारचा अपघात; टायगर श्रॉफने शेअर केला व्हिडीओ
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) अॅक्शन स्टार म्हणून ओळखले जाते. तो स्टंट आणि डान्स मुव्ह्जमुळे अनेकदा चर्चेत असतो. फिटनेससाठीदेखील टायगर ओळखला जातो. आता टायगरचा पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने पाय मोडल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
View this post on Instagram
November Movie Releases : नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Movie : नोव्हेंबर महिन्यात सिनेप्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात 'मिली', 'डबल एक्सएल', 'ऊंचाई', 'यशोदा', 'दश्यम 2' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.