Entertainment News Live Updates : तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Aug 2023 04:37 PM
Milind Gawali: "रागावणं, चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला..."; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मिलिंद हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या भेटीस येतात. तसेच मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. नुकतेच मिलिंद गवळी यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Seema Haider: सीमा हैदरने दिल्या ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; चित्रपटाची ऑफर नाकारली

Seema Haider: पाकिस्तानची  सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) या  जोडप्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सीमा आणि सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहे. 



Girish Oak : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत येणार ट्वि्स्ट; डॉ. गिरीश ओक दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

Girish Oak Entry In Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्मिते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत अभिनेते डॉ. गिरीश ओक (Girish Oak) यांची एन्ट्री होणार आहे. गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh: 'तुमच्याशिवाय जगणे ...'; विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलिया आणि रितेश भावूक, शेअर केली पोस्ट

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh:  महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (14 ऑगस्ट) पुण्यतिथी आहे.  14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले. नुकतीच विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच रितेशची पत्नी जिनिलियानं (Genelia Deshmukh) देखील इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 



Box Office : थिएटरमधल्या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

Box Office Collection : मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा बहरली आहे. एकीकडे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेले सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जात आहेत. तर दुसरीकडे 12 ते 15 ऑगस्ट या लॉन्ग वीकेंडचा सिने-निर्मात्यांना चांगलाच फायदा झाला आहे. देवदर्शन आणि पर्यटनाला जाण्यासह सिनेप्रेमींची पाऊले सिनेमागृहाकडे वळली आहेत. एकंदरीतच थिएटरमधल्या या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला पाहायला मिळाला आहे.

Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2'चा आज रंगणार महाअंतिम सोहळा; 'TOP 5'स्पर्धक, बक्षीसाची रक्कम अन् बरंच काही.. जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

Bigg Boss OTT 2 Grand Finale : 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT 2) हा ओटीटी विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आज या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा (Bigg Boss OTT 2 Grand Finale) पार पडणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता किंवा विजेती नक्की कोण होणार हे जाणून घेण्याची 'बिग बॉस' (Bigg Boss) प्रेमींना उत्सुकता आहे. 


Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2'चा आज रंगणार महाअंतिम सोहळा; 'TOP 5'स्पर्धक, बक्षीसाची रक्कम अन् बरंच काही.. जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2'चा आज रंगणार महाअंतिम सोहळा; 'TOP 5'स्पर्धक, बक्षीसाची रक्कम अन् बरंच काही.. जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

Bigg Boss OTT 2 Grand Finale : 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT 2) हा ओटीटी विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आज या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा (Bigg Boss OTT 2 Grand Finale) पार पडणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता किंवा विजेती नक्की कोण होणार हे जाणून घेण्याची 'बिग बॉस' (Bigg Boss) प्रेमींना उत्सुकता आहे. 


Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2'चा आज रंगणार महाअंतिम सोहळा; 'TOP 5'स्पर्धक, बक्षीसाची रक्कम अन् बरंच काही.. जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

Gashmeer Mahajani: 'आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. काही घडत नाहीये, काय करु यार...'; नेटकऱ्याचा प्रश्न, गश्मीर उत्तर देत म्हणाला, 'मी पण...'

Gashmeer Mahajani:  अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. गश्मीर त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो.  गश्मीरनं नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क गश’ (Ask Gash) हे सेशन ठेवले. या सेशनच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिली.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva : 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क

Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आजही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी निर्माते वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा दिवसेंदिवस वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावे करत आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा (Sairat) रेकॉर्ड मोडू शकतो. 

Siddarth Jadhav: "त्यांच्या आशीर्वादाने मी जग बघायला फिरलो आणि आज..."; सिद्धार्थच्या आई-बाबांची फॉरेन टूर

Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतो. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबाबत सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली.



Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'मधील शिव ठाकरेचा प्रवास संपला; चाहते म्हणाले,"आमचा खेळाडू हरणारा नाही"

Shiv Thakare On Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Kharron Ke Khiladi 13) हा रोहित शेट्टीचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील अनेक मंडळी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे. मराठमोळा 'आपला माणूस' शिव ठाकरेही (Shiv Thakare) या पर्वात सहभागी झाला होता. पण आता यापर्वातील त्याचा प्रवास संपला आहे.


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'मधील शिव ठाकरेचा प्रवास संपला; चाहते म्हणाले,"आमचा खेळाडू हरणारा नाही"

Gadar 2 Box Office Collection : सनी देओलचा सिनेमा आता प्रेक्षकांचा झाला; 'Gadar 2'ने तीन दिवसांत केली 135 कोटींपेक्षा अधिक कमाई

Gadar 2 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वर्षांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत आहेत. 


Gadar 2 Box Office Collection : सनी देओलचा सिनेमा आता प्रेक्षकांचा झाला; 'Gadar 2'ने तीन दिवसांत केली 135 कोटींपेक्षा अधिक कमाई

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Jailer Movie Marathi Actor : रजनीकांतच्या 'जेलर'मध्ये झळकलेत दोन मराठमोळे चेहरे; एकाची तर थलायवासोबतच एन्ट्री


Jailer Movie Marathi Actor : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) हा सिनेमा सध्या देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रजनीकांतचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'जेलर' हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. रजनीकांतच्या 'जेलर' या सिनेमात दोन मराठी कलाकारांनी काम केलं आहे.मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) आणि गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) या मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या दोन कलाकारांनी 'जेलर' या सिनेमात काम केलं आहे. गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत एन्ट्री घेतली आहे. मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते कौतूकाचा वर्षाव करत आहेत.


Hema Malini : एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी : हेमा मालिनी


Hema Malini : 'सोसायटी अचिव्हर्स' या मासिकाच्या अनावरण सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), योगी आणि त्यांच्या मथुरेबद्दल भाष्य केलं. दरम्यान मोदी एकटेच सर्वांना भारी, आता कोणाचीही पाळी येणार नाही, असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केलं. 


KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन


Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 14 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती 15' सुरू होत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक प्रिया पाटीलने (Priya Patil) डिझाइन केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.