Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2'चा आज रंगणार महाअंतिम सोहळा; 'TOP 5'स्पर्धक, बक्षीसाची रक्कम अन् बरंच काही.. जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...
Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2' या लोकप्रिय कार्यक्रमाचा आज ग्रँड फिनाले फार पडणार आहे.
Bigg Boss OTT 2 Grand Finale : 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT 2) हा ओटीटी विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आज या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा (Bigg Boss OTT 2 Grand Finale) पार पडणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता किंवा विजेती नक्की कोण होणार हे जाणून घेण्याची 'बिग बॉस' (Bigg Boss) प्रेमींना उत्सुकता आहे.
आज रंगणार 'बिग बॉस ओटीटी 2'चा ग्रँड फिनाले
'बिग बॉस ओटीटी 2'चा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 'बिग बॉस'चा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला चांगलं टीआरपीदेखील मिळतं. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचा कार्यक्रमाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता 'बिग बॉस ओटीटी' हा कार्यक्रम निर्मात्यांनी सुरू केला. हा कार्यक्रमालाही प्रेक्षकांची चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी 2'चा आता ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
'बिग बॉस ओटीटी 2'च्या यशात सलमान खानसह कास्टिंग दिग्दर्शक, निर्माते आणि स्पर्धकांचाही मोठा वाटा आहे. आठ आठवडे सुरू झालेला 'बिग बॉस ओटीटी 2'चा प्रवास आता संपणार आहे. 'बिग बॉस ओटीटी 2'च्या या पर्वातील अभिषेकची धमाकेदार खेळी, पूजा भट्टची मानवता, मनीषा पानीच्या अदा, एल्विशचे पंच आणि बेबिका धुर्वेच्या गोंधळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण आता स्पर्धकांचा हा प्रवास आज संपणार आहे.
View this post on Instagram
'बिग बॉस ओटीटी 2' कुठे पाहता येणार?
'बिग बॉस ओटीटी 2' हा कार्यक्रम प्रेक्षकांना 14 ऑगस्टला रात्री 9 वाजता पाहता येणार आहे. तसेच हा पूर्ण सोहळा प्रेक्षकांना जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे.
कोण आहेत 'बिग बॉस ओटीटी 2'चे 'TOP 5' स्पर्धक?
'बिग बॉस ओटीटी 2'चा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पूजा भट्ट, एल्विश यादव, मनीषा रानी, अभिषेक यादव, बेबिरा धुर्वे हे 'बिग बॉस ओटीटी 2'मधील 'टॉप 5' स्पर्धक आहेत. आता या पाच जणांमधून 'बिग बॉस ओटीटी 2'ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अभिषेक आणि एल्विश या दोघांमध्ये चांगलीच लढत रंगणार आहे.
'बिग बॉस ओटीटी 2'च्या विजेत्याला काय मिळणार?
'बिग बॉस ओटीटी 2'च्या विजेत्याला 25 लाख रुपये आणि 'बिग बॉस ओटीटी'ची ट्रॉफी मिळणार आहे.
'बिग बॉस ओटीटी 2' या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) त्यांच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. त्यामुळे सलमान आणि शाहरुखला एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या