- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
-
बॉलीवूड
Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली नाट्यपंढरी सांगलीत; प्रशांत दामलेंनी घंटा वाजवून केली सुरुवात
Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली नाट्यपंढरी सांगलीत; प्रशांत दामलेंनी घंटा वाजवून केली सुरुवात
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
29 Dec 2023 03:25 PM
Telly Masala : माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय? ते नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली सांगलीत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Read More
Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली नाट्यपंढरी सांगलीत; प्रशांत दामलेंनी घंटा वाजवून केली सुरुवात
Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यपंढरी सांगलीत रोवली गेली आहे. प्रशांत दामलेंनी (Prashant Damle) घंटा वाजवून 100 व्या नाट्यसंमेलनाची सुरुवात केली आहे.
Read More
Top 10 Web Series 2023 : 'फर्जी', 'द रेल्वे मॅन' ते 'काला पानी'; 'या' वेबसीरिजने गाजवलं सरतं वर्ष
Year Ender 2023 : 'फर्जी', 'दहाड','द नाईट मॅनेजर','ताली' ते 'काला पानी' अशा अनेक वेबसीरिजने 2023 हे वर्ष गाजवलं आहे. या सीरिजने घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे.
Read More
Filmfare Awards 2024 : यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातमध्ये; 'या' दिवशी होणार अवॉर्ड सेरेमनी
Filmfare Awards 2024 : फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची बॉलिवूडकरांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार आहे.
Read More
Maharashtrachi Hasyajatra : नववर्षाच्या स्वागतासाठी, हास्याची नॉन स्टॉप पार्टी! हास्यजत्रेतील जत्रेकरी प्रेक्षकांना देणार मनोरंजनाची मेजवानी
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा 31 डिसेंबर 2023 रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हास्याची नॉन स्टॉप पार्टी मिळणार आहे.
Read More
Malaika Arora Wedding : अरबाजच्या लग्नानंतर पहिली पत्नी मलायकाचा विवाहाबाबत मोठा खुलासा; म्हणाली,"पुन्हा संसार थाटणार"
Malaika Arora on Second Marriage : अभिनेत्री मलायका अरोराने 'झलक दिखला जा 11'च्या (Jhalak Dikhhla Jaa 11) मंचावर दुसऱ्या लग्नासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.
Read More
Ira Khan Wedding : आमिर खानची लेक इरा अडकणार लग्नबंधनात! महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार विवाहसोहळा; प्री वेडिंग फंक्शन ते रिसेप्शन; जाणून घ्या सर्वकाही
Ira Khan Nupur Shikhare : आमिर खानची लाडकी लेक इरा नुपुर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनला आता सुरुवात झाली आहे.
Read More
Madhuri Dixit : पाच मृत्यूचा समज, अंधश्रद्धेचे 'पंचक' सोडवणार, माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय?
Madhuri Dixit Majha Katta : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) निर्मित 'पंचक' (Panchak) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या निमित्ताने या जोडप्याने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
Read More
Box office Collection : प्रभासच्या 'सालार'ने रचला इतिहास! शाहरुखचा 'डंकी' मात्र डगमगला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Dunki Salaar Box Office Collection : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
Read More
Sur Nava Dhyas Nava : माधुरी दीक्षितसोबत रंगणार 'सूर नवा ध्यास नवा'चा ग्रँड फिनाले; मकरंद अनासपुरे दाखवणार नृत्याचा जलवा
Madhuri Dixit in Sur Nava Dhyas Nava : प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या माधुरी दीक्षितसोबत 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे.
Read More
Hina Khan Hospitalized : अभिनेत्री हिना खानची प्रकृती खालावली; रुग्णालयातील फोटो शेअर करत दिली माहिती
Hina Khan : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खानची प्रकृती खालावली आहे. अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार
Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.
Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता".
Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"
Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.