Telly Masala : 'ठरलं तर मग' मालिकेत ट्विस्ट ते 'नाळ 2' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Oct 2023 07:00 PM
Boyz 4 : महाराष्ट्र थिरकणार 'ये ना राणी' गाण्यावर; 'बॉईज 4'मधील नवं गाणं आऊट
Boyz 4 : 'बॉईज 4' या सिनेमातील 'ये ना राणी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Telly Masala : 'ठरलं तर मग' मालिकेत ट्विस्ट ते 'नाळ 2' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Leo Review : थलापती विजयचा 'लियो'कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Leo Review : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Vishakha Subhedar : विशाखा सुभेदार म्हणतेय,"एकदा येऊन तर बघा, तुम्हाला रिटर्न पाठवणार नाही"; नेमकं प्रकरण काय?
Vishakha Subhedar : अभिनेत्री विशाखा सुभेदारचा 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Tiger Shroff : 'Singham 3'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री! 'या' भूमिकेत झळकणार अ‍ॅक्शन किंग
Tiger Shroff Look From Singham 3 : 'सिंघम 3' या सिनेमातील टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) लूक आऊट झाला आहे. Read More
Jr NTR on Oscars : ज्युनिअर एनटीआर पुन्हा ऑस्कर गाजवणार! अभिनेत्याच्या शिरपेचात रोवला आणखी एक मानाचा तुरा
Jr NTR : ऑस्कर अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅन्ड सायन्सेसच्या कलाकार यादीत ज्युनियर एनटीआरचा समावेश झाला आहे. Read More
Nagarjuna : सुपरस्टार नागार्जुनवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन
Nagarjuna : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनच्या बहिणीचं निधन झालं आहे. Read More
Nagraj Manjule Naal 2 : 'जाऊ दे ना वं'च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलं 'भिंगोरी'; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'ची प्रेक्षकांना उत्सुकता
Naal 2 Song : नागराज मंजुळे यांच्या 'नाळ 2' या सिनेमातील 'भिंगोरी' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Veer Savarkar Secret Files : 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स'मधून उलगडणार भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास; शूटिंगला सुरुवात
Veer Savarkar Secret Files : 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग'मालिकेत नवा ट्विस्ट; सायली-अर्जुनचं नातं कोणतं वळण घेणार?
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव होत आहे. Read More
Leo Twitter Review : थलापती विजयचा 'लियो' सुसाट; थिएटरबाहेर गर्दी करत चाहत्यांचा जल्लोष;म्हणाले,"ब्लॉकबस्टर फिल्म"
Leo : थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Jhalak Dikhhla Jaa 11 : शिव ठाकरे ते शोएब इब्राहिम; 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होणार 'हे' स्पर्धक
Jhalak Dikhhla Jaa : 'झलक दिखला जा 11'च्या 10 स्पर्धकांची नावं आता समोर आली आहेत. Read More
Sunny Deol Birthday : सनी देओलचा वाढदिवस होणार 'गदर'मय; 1000 तारा सिंहच्या उपस्थित साजरा होणार बर्थडे
Happy Birthday Sunny Deol : अभिनेता सनी देओलसाठी यंदाचा वाढदिवस खूप खास असणार आहे. Read More
Scam 2003 Part 2 Trailer : मुंबईका किंग कौन? हंसल मेहतांच्या 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी पार्ट 2' चा ट्रेलर आऊट!
Scam 2003 Part 2 : 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी पार्ट 2' या वेबसीरिजचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.