Nagarjuna : सुपरस्टार नागार्जुनवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन
Nagarjuna : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनच्या बहिणीचं निधन झालं आहे.
Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. दिवंगत दिग्गज अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि सुपरस्टार नागार्जुनची बहिण नागा सरोजा (Naga Saroja) यांचे निधन झाले आहे. नागा सरोजा यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती.
नागार्जुनच्या मोठ्या बहिणीचं निधन
नागार्जुनची मोठी बहिण अर्थात नागा सरोजा यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. अखेर 17 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागा सरोजा या नागार्जुनची तिसरी बहिण होती. नागा यांच्या निधनाचा अक्किनेनी आणि नागार्जुनला मोठा धक्का बसला आहे. राजकीय आणि सिनेसृष्टीतील मंडळी नागार्जुनची भेट घेत आहेत.
नागार्जुन यांच्या तीन पिढ्या सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. तेलुगू सिनेमांत अक्किनेनी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. नागा सरोज यांनी सिनेमांत काम केलं नसलं तरी पडद्यामागे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नागार्जुनचा प्रत्येक सिनेमा त्या आवडीने पाहत असे. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांना त्या हजेरी लावत असे.
नागार्जुन यांच्या तीन पिढ्या सिनेसृष्टीत अॅक्टिव्ह असल्या तरी अक्लिनेनींची तिसरी मुलगी अर्थात सरोज या मात्र कायम सिनेसृष्टीपासून दूर राहिल्या. सिनेसृष्टीत काम करण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही. घरात अभिनयाचं बाळकडू असूनही अभिनेत्री होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं नाही.
नागार्जुनबद्दल जाणून घ्या...
नागार्जुनने दाक्षिणात्य सिनेमांसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नागार्जुन अक्किनेनी हे साऊथ इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. नागार्जुन यांचा जन्म 29 ऑगस्ट 1959 रोजी चेन्नई येथे झाला. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच, नागार्जुन एक चित्रपट निर्माते आणि उद्योगपती देखील आहेत. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर देखील प्रसिद्ध अभिनेते होते. चित्रपट विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील असल्याने नागार्जुन यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्वाची ओढ होती. अगदी लहान वयातच त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
तब्बू अन् नागार्जुन यांच्या प्रेमाची चर्चा!
काही वर्षांपूर्वी नागार्जुन (Nagarjuna Akkineni) सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. एका चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नागार्जुनचे लग्न झाले होते. पण, तरीही दोघांचे अफेअर सुरूच होते. दोघेही जवळपास 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नागार्जुन यांचे तब्बूवर प्रेम होते, पण त्यांना त्यांचे लग्नही मोडायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी तब्बूशी लग्न केले नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.
संबंधित बातम्या