Celebrity Diary : 'आपल्या सिद्धू'ला करायचयं लेखक क्षितिज पटवर्धनच्या दिग्दर्शनाखाली काम; जाणून घ्या सिद्धार्थ जाधवचा आवडीचा खाद्यपदार्थ?
Celebrity Diary : 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या खास गोष्टी...
Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात लाडक्या सिद्धूला म्हणजेच सिद्धार्थ जाधवला (Siddharth Jadhav) कोणते पदार्थ बनवता येतात? ते सध्याच्या राजकारणावर त्याचं काय मत आहे...
'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?
- आई-बाबा, भाऊ, स्वरा आणि इरा या माझ्या मुली जवळच्या मैत्रीणी आहेत.
कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?
- 'खतरों के खिलाडी' मराठीत सुरू झालं तर ते होस्ट करायला आवडेल.
पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?
- क्षितिज पटवर्धनने जर दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केलं तर त्याच्यासोबत सिनेमा करण्याची इच्छा आहे.
भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?
- हो.. मित्राचे कपडे घालून अनेकदा कॉलेजला गेलो आहे.
गॅलरीतला शेवटचा फोटो
स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?
- चहा, ऑम्लेट, वरण-भात
आवडता खाद्यपदार्थ?
- आईने बनवलेलं सुकं चिकन आणि बटाट्याची भाजी, तृप्तीच्या हातचं ब्लॅक चिकन
कोणत्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायला आवडतं?
- नाटकाच्या प्रयोगादरम्यान लोकलने प्रवास करायला आवडतं.
मनोरंजन सृष्टीतला आदर्श?
- अशोक सराफ, भरत जाधव....अनेक आहेत. एक नाव नाही घेता येणार.
सध्याच्या राजकारणावर एक शब्द -
धुरळा
सिद्धार्थ जाधवबद्दल जाणून घ्या...
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने अनेक नाटकांत, सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'जागो मोहन प्यारे', 'तुमचा मुलगा करतोय काय', 'लोच्या झाला रे' आणि 'गेला उडत' ही सिद्धार्थची नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'दे धक्का', 'मी शिवाजी राजे बोलतोय' अशा दर्जेदार सिनेमांत सिद्धार्थने काम केलं आहे. 'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स', 'सिम्बा' अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांत सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थने रुपारेल कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिकांमध्ये काम केलं आहे. द्रेवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतोय काय' या नाटकाच्या माध्यमातून सिद्धार्थने नाट्यसृष्टीत पदार्पण केलं. 'आपला सिध्दू' या सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची क्रेझ सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येते.
संबंधित बातम्या