एक्स्प्लोर
'यशराज, टी सीरिज'सारख्या म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे
अंमलबजावणी संचलनालयाने टी सीरिज, यशराज, सारेगम, युनिव्हर्सल आणि सोनी या प्रख्यात म्युझिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकले

मुंबई : मुंबईतील टी सीरिज, यशराज, सारेगम यासारख्या बड्या म्युझिक कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये भारतात आणल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे. अंमलबजावणी संचलनालयाने टी सीरिज, यशराज, सारेगम, युनिव्हर्सल आणि सोनी या प्रख्यात म्युझिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपातून शुक्रवार सकाळपासून या कंपन्यांमध्ये ईडी तपास करत आहे.
आणखी वाचा























