Elvish Yadav on Aryan Khan : एल्विशने कधी काळी आर्यन खानला केलं होतं रोस्ट, म्हणून आता नेटकरी म्हणतात... 'Karma is Back!', अटकेनंतर 'तो'व्हिडिओ होतोय व्हायरल
Elvish Yadav Viral Video on Aryan Khan : सापच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी युट्युबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सध्या एल्विशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Elvish Yadav Viral Video on Aryan Khan : युट्युबच्या माध्यमातून यशस्वी झालेला एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. त्याच्या व्हिडिओमुळे तो चाहत्यांच्या पसंतीस पडला देखील पण सध्या त्याला त्याचे दिवस तुरुंगात घालवावे लागतायत. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकणी एल्विशला नोएडा पोलिसांनी अटक केलीये. त्याचप्रमाणे कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली. पण सध्या सोशल मीडियावर त्याचा आर्यन खानला (Aryan Khan) रोस्ट केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.
एल्विशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बराच चर्चेत आलाय. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत कर्मा इज बॅक अशा कमेंट्स देखील केल्यात. 3 ऑक्टोबर 2021 मध्ये ड्रग्ज तस्करीच्या प्रकणात बॉलीवूडच्या किंग खानचा लेक शाहरुखला एनसीबीने अटक केली होती. तेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यावेळी आर्यनच्या समर्थनार्थ अनेक जण उभे होते. पण एल्विशने या सगळ्याचा विरोध केला होता.
एल्विशने या व्हिडिओमध्ये काय म्हटलं होतं?
'मला काय आवडत नाही माहीत आहे का? ट्विटरवर 'आय स्टँड विथ आर्यन खान' ट्रेंड करणारे त्याचे अंध चाहते मला आवडत नाहीत. भाऊ. तू किती वेडा आहेस मित्रा, किती आंधळा आहेस, एखाद्या माणसाने काहीतरी चुकीचे केले, एक मुलगा ड्रग्जसह पकडला गेला, त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले, त्याला अटक झाली, भाऊ, हे सर्व घडले. म्हणजे गुन्हेगाराने जे काही केले असेल, त्याने गुन्हा केला असेल, सर्व काही त्याच्यासोबत घडले असेल, यानंतरही त्याचे चाहते ते अजिबात मानायला तयार नाहीत, असं एल्विशने त्या व्हिडिओमध्ये म्हटलं.
एल्विश यादवचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तसेच या व्हिडिओमध्ये एल्विने ड्रग्ज या गोष्टीला नॉर्मलाईज करावं असं मत मांडलं होतं. त्यामुळे त्याच्या या व्हिडिओ टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 17 मार्च रोजी एल्विश यादव नोएडा पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा एल्विश पोलिसांच्या प्रश्नांची नीट उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळे तिथून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Its really funny to see today his every statements going against him & his fans “KARMA” #MunawarFaruqui 👇 pic.twitter.com/PrMFoR3G1y
— maxpain (@maxpain000021) March 17, 2024