एक्स्प्लोर

अभिनेत्री ममता कुलकर्णीची मुंबईतील घरं सील करण्याचा आदेश

2016 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

ठाणे : बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचा आदेश ठाण्यातील विशेष एनडीपीएस कोर्टाने दिला आहे. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील प्रमुख आरोपींमध्ये ममता कुलकर्णीचा समावेश आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात ममता कुलकर्णी हजर न झाल्याने मुंबईतील विविध भागात असलेले तीन आलिशान फ्लॅट्स सील करण्याचा आदेश मागील आठवड्यात दिला होता. ममताच्या या तीन आलिशान फ्लॅट्सची किंमत सुमारे 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. ममता कुलकर्णी फरार घोषित विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितलं की, "याबाबत अपील केल्यानंतर कोर्टाने ममता कुलकर्णीच्या तिन्ही संपत्ती सील करण्याचा आदेश दिला." तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी कोर्टात हजर न झाल्याने ममताला फरार घोषित करण्यात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात ममता कुलकर्णीला विकी गोस्वामीसह मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत तिचा समावेश होता. "ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांच्या आत्मसमर्पणाचा प्रयत्न करु," असं ठाणे पोलिसांनी सांगितलं होतं. ममता कुलकर्णी केनियात? ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी सध्या ते केनियात राहत असल्याचं कळतं. 6 जून 2017 रोजी ठाणे कोर्टाने गोस्वामी आणि कुलकर्णीला फरार घोषित केलं होतं. यानंतर ममता कुलकर्णीची संपत्ती सील करण्यासाठीबाबतचा अर्ज पोलिसांनी कोर्टात केला होता. कोर्टाने ममताची संपत्ती सील करण्याचा अर्ज प्रलंबित ठेवला होता आणि दोन्ही फरार आरोपींना हजर राहण्यासाठी एक संधी दिली होती. परंतु दोघेही कोर्टात हजर राहण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं समोर आल्यावर न्यायाधीशांनी तिची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला. काय आहे प्रकरण? 2016 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीवरुन, ठाणे पोलिसांनी 13 एप्रिल 2016 रोजी दोन आरोपींना अटक करुन तब्बल 12 लाख रुपयांचं एफेड्रिन जप्त केलं होतं. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या अॅव्हॉन लाईफसायन्सेस ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफेड्रिन ड्रग्ज सापडलं. एफेड्रिन पावडरचा उपयोग नशा करण्यासाठी होतो. त्याचा वापर पार्टीमध्ये लोकप्रिय असलेल्या मेथेम्फेटामाईनचं उत्पादन करण्यासाठी केला जातो. संबंधित बातम्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करा : कोर्ट ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव: साक्षीदार

..म्हणून ममता कुलकर्णीने मुस्लीम धर्म स्वीकारला?

ABP EXCLUSIVE : मी लग्नही केलं नाही आणि 12 वर्ष शारीरिक संबंधही ठेवले नाही- ममता कुलकर्ण

ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये, ठाणे पोलिसांकडून शिक्कामोर्तब !

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...Job Majha : रेल इंडिया टेकनिकल अॅन्ड इकोनॉमिक सर्विस येथे नोकरीची संधी : 07 Feb 2025 : ABP MajhaArvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंतVastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget