Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा 'दृश्यम 2' 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील; दुसऱ्या आठवड्यातही तुफान कमाई
Drishyam 2 : सुपरस्टार अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
Drishyam 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या बहुचर्चित 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले असले तरीही या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. आता हा सिनेमा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
समीक्षकांसह चाहत्यांकडून 'दृश्यम 2' सिनेमाचं कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'दृश्यम 2' या सिनेमाने रिलीजच्या बाराव्या दिवशी पाच कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे सिनेमाने 150 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 154 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.
'दृश्यम 2'ची कमाई :
पहिला दिवस - 15.38 कोटी
दुसरा दिवस - 21.59 कोटी
तिसरा दिवस - 27.17 कोटी
चौथा दिवस - 11.87 कोटी
पाचवा दिवस - 11 कोटी
सहावा दिवस - 9.55 कोटी
सातवा दिवस - 9 कोटी
आठवा दिवस - 7.87 कोटी
नऊवा दिवस - 14.05 कोटी
दहावा दिवस - 17-18 कोटी
अकरावा दिवस - 5.44 कोटी
बारावा दिवस - 5 कोटी
एकूण कमाई - 154 कोटींपेक्षा अधिक
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर या वर्षात अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी काहीच सिनेमे कमाईच्या बाबतीत उजवे ठरले. फक्त तीन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. अनुपम खेर यांचा 'द कश्मीर फाइल्स', सुपरस्टार कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' आणि आलिया भट्ट, रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' या तीन सिनेमांचा यात समावेश आहे. आता या सिनेमांच्या यादीत 'दृश्यम 2' या सिनेमाचादेखील समावेश झाला आहे. रिलीजच्या तिसऱ्याच वीकेंडला हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करू शकतो.
अजय देवगणच्या 'दृष्यम 2' या सिनेमाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून आता ते या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. तर दुसरीकडे रिलीजच्या सहा आठवड्यानंतर 'दृश्यम 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा प्रेक्षक घरबसल्या पाहू शकतात.
संबंधित बातम्या
Drishyam 2 Box Office Collection : दहाव्या दिवशीही 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)