कार्तिक आर्यनची नवी गर्लफ्रेंड कोण? 'भूल भुलैया 3'च्या अभिनेत्याचा खुलासा, नावंही सांगितलं...
Kartik Aaryan: अलिकडेच कार्तिक आर्यन त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 3' च्या प्रमोशनसाठी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान अभिनेत्यानं स्वतःच त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे.
![कार्तिक आर्यनची नवी गर्लफ्रेंड कोण? 'भूल भुलैया 3'च्या अभिनेत्याचा खुलासा, नावंही सांगितलं... kartik aaryan bhool bhulaiyaa 3 actor revealed his new girlfriend name at great indian kapil Sharma show vidya balan madhuri dixit कार्तिक आर्यनची नवी गर्लफ्रेंड कोण? 'भूल भुलैया 3'च्या अभिनेत्याचा खुलासा, नावंही सांगितलं...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/04/2ee1c8121b8d05b201c70c33000877d0173069130788388_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kartik Aaryan: सध्या बॉलिवूड (Bollywood) फॅन्समध्ये कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) विशेष चर्चा रंगली आहे. कार्तिकचा नुकताच रिलीज झालेला 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. अलिकडेच कार्तिक त्याच्या हॉरर कॉमेडी (Horror Comedy) चित्रपटातील त्याचे सर्व सहकलाकार, विद्या बालन (Vidya Balan), तृप्ती डिमरी (Trupti Dimari), राजपाल यादव आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्यासोबत 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये पोहोचला होता. कपिल शर्मा शोचा हा एपिसोड धमाल होता. याच एपिसोडमध्ये कार्तिकनं त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला आहे.
कार्तिककडून गर्लफ्रेंडचं नाव उघड
दरम्यान, कपिल शर्मा शो दरम्यान, त्याच्या पाच पाहुण्यांशी ट्रुथ ऑर डेअर गेम खेळतो. त्यावेळी कार्तिकवर ट्रुथ येतं आणि त्याला खरं बोलावंच लागतं. त्यावेळी विद्या बालन कार्तिकला प्रश्न विचारते. विद्या त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव विचारते. पुढे बोलताना विद्या हेदेखील सांगते की, ज्यावेळी ती 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं शुटिंग करत होती, त्यावेळी कार्तिक आर्यन सतत त्याच्या फोनवर असायचा. त्यावेळी एकदा विद्यानं ठरवून कार्तिक काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्तिक फक्त मी टू, मी टू एवढं बोलत असल्याचं तिच्या कानावर पडलं. त्यामुळे विद्यानं विचार केला की, कार्तिकचं फोनवरचं बोलणं काहीसं "लव यू, मी टू. लव यू, मी टू." असंच असेल. त्यावेळी कार्तिक मस्करीत म्हणतो की, तिचं नाव मीतू आहे.
कपिल शर्मा शोमध्ये कार्तिक आर्यनची आई माला तिवारीही शोमध्ये उपस्थित होत्या. त्या प्रेक्षकांमध्ये पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्याच्या आईला गर्लफ्रेंडबाबत विचारण्यात आलं. तिनं सांगितलं की, मी विचारतेय की, कुणाकुणाचं नाव घेऊ...? एकच असेल तर घेता येईल...? त्याच्या आयुष्यात अनेक मुली आहेत.
'भूल भुलैया 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
दरम्यान, भूल भुलैया 3 बद्दल बोलायचं झालं तर, 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. विशेष म्हणजे, रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर सिंघम अगेन सोबत संघर्ष असूनही, कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडीनं 35.5 कोटी रुपयांच्या कमाईसह भारतात आपलं खातं उघडलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. SACNILC च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच, पहिल्या रविवारी 33.5 कोटी रुपये कमावले आणि यासोबतच चित्रपटानं तीन दिवसांत 106 कोटी रुपयांची कमाई केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)