एक्स्प्लोर
'डर्टी फॅमिली', फादर्स डेच्या फोटोवरुन सनीवर टीका
फोटोत सनी आणि तिची मुलगी निशा ही न्यूड दिसत आहे तर पती डॅनियल वेबरही शर्टलेस आहे. हीच गोष्ट ट्रोलर्सला रुचलेली दिसत नाही. म्हणूनच सोशल मीडियावर सनीला लक्ष्य केलं जात आहे.

मुंबई: 'फादर्स डे' निमित्त अनेकांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या. काहींनी सोशल मीडियावर वडिलांसोबतचे फोटोही शेअर केले. तर दुसरीकडे अभिनेत्री सनी लिओनीचा पती डॅनियन वेबरने आपली मुलगी आणि पत्नी सनीसोबतचा एक फोटो शेअर केला. याच फोटोवरुन आता सोशल मीडियावर सनीला ट्रोल केलं जात आहे. फोटोत सनी आणि तिची मुलगी निशा ही न्यूड दिसत आहे तर पती डॅनियल वेबरही शर्टलेस आहे. हीच गोष्ट ट्रोलर्सला रुचलेली दिसत नाही. म्हणूनच सोशल मीडियावर सनीला लक्ष्य केलं जात आहे. हा फोटो शेअर करताना सनीचे आभार मानत पती वेबरने म्हटलंय की, "निशाने माझं मन जिंकलंय आणि आता ती माझ्यासाठी सर्वस्व आहे, निशाला भेटवल्याबद्दल आणि आमच्या दोघांवर प्रेम करण्यासाठी धन्यवाद."
तर काहींनी या फोटोवर चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा परिपूर्ण फोटो असून त्यात प्रेम दिसतं, असं एकाने म्हटलं आहे. तसंच सुंदर कुटुंब अशी कमेंटही एका युझरने केली आहे.
दुसरीकडे सनी लिओनीने गुरुद्वाऱ्याबाहेर डॅनियल वेबरने निशा, अशेर आणि नोव्हाला कवेत उचलून घेतलेला फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करुन फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र 'डर्टी फॅमिली' असं म्हणत ट्रोलर्सने सनीवर निशाणा साधला आहे. तर काहींनी म्हटलं की, सनी प्रसिद्धीसाठी आता आपल्या मुलीचाही वापर करत आहे.
तर काहींनी या फोटोवर चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा परिपूर्ण फोटो असून त्यात प्रेम दिसतं, असं एकाने म्हटलं आहे. तसंच सुंदर कुटुंब अशी कमेंटही एका युझरने केली आहे.
दुसरीकडे सनी लिओनीने गुरुद्वाऱ्याबाहेर डॅनियल वेबरने निशा, अशेर आणि नोव्हाला कवेत उचलून घेतलेला फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करुन फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सनी लिओनीने एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिला आसरा दिला आहे. तसंच आयुष्यभर तिच्या सुरक्षेची काळजी घेईन, असंही ती म्हणाली होती. मात्र तिच्याबाबतीत असणाऱ्या पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळेच अनेकांना या कौटुंबिक फोटोतही न्यूडिटी दिसली. या सर्व प्रकरणातून लोकांची मानसिकता अजूनही बदलेली नाही, हेच दिसून येत आहे.The Man...the Father...the husband...the friend...the one that holds us together, given us the best life and a infinite amount of love! We love you Papa! @dirrty99 Love - Nisha, Asher Noah and me :) Happy Fathers Day!! pic.twitter.com/kXH2NzgSg0
— Sunny Leone (@SunnyLeone) June 17, 2018
आणखी वाचा























