एक्स्प्लोर

Subhash Ghai : मोठी बातमी! सुभाष घई लिलावती रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु

Subhash Ghai : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

Subhash Ghai :  बॉलिवूड सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) यांच्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि वारंवार चक्कर देखील येत होती. सध्या त्यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

रुग्णालयाच्या सूत्रांकडून एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घई यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चौहान, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तसेच सुभाष घई यांची प्रकृती  पूर्वीपेक्षा चांगली असून त्यांना एका दिवसांत आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे. 

राम लखन, सौदागर, परदेस यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक

सुभाष घई यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. कालीचरण, कर्ज, कर्मा, सौदागर, खलनायक या चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. सुभाष घई यांनी शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट बनवला होता. याशिवाय 2008 मध्ये त्यांनी ताल आणि सलमान खानचा युवराज या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.                   

नुकतच 'या' सिनेमांविषयी केलं होतं भाष्य

2004 मध्ये रिलीज झालेल्या ऐतराजचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले नाही, परंतु त्यांनी त्याची निर्मिती केली होती. नुकताच सुभाष घई यांनी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणाही केली होती. ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्याऐवजी ते नवीन चेहरे आणणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय संजय दत्तसोबत सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच पाहायला मिळणार आहे. वृत्तानुसार, सुभाष घई खलनायक 2 मध्ये काम देखील करत आहेत.                                   

View this post on Instagram
 
A post shared by SG (@subhashghai1)

ही बातमी वाचा : 

Pushpa 2 Box Office Collection Day 3: सलमान-आमिरचे रेकॉर्ड्स तिसऱ्याच दिवशी मोडले, बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चीच दहशत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget