Dimple Kapadia : डिंपल कपाडिया वयाच्या 17व्या वर्षी गरोदर, 15 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नांसाठी अभिनय सोडला!
Dimple Kapadia : डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना (Rajesh Khanna) लग्नाच्या नऊ वर्षांनंतर वेगळे राहायला लागले होते. त्यानंतर डिंपलने पुन्हा चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.
Dimple Kapadia : अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी तिने राज कपूर यांच्या 'बॉबी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या माध्यमातून तिला इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख मिळाली. 'बॉबी' हा चित्रपट रिलीज होण्याआधीच डिंपल कपाडियाने राजेश खन्नासोबत (Rajesh Khanna) लग्न केलं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. पल कपाडिया आणि राजेश खन्ना (Rajesh Khanna) लग्नाच्या नऊ वर्षांनंतर वेगळे राहायला लागले होते. त्यानंतर डिंपलने पुन्हा चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.
डिंपल कपाडियाने वयाच्या 16 व्या वर्षी आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असलेल्या राजेश खन्नासोबत लग्न केलं होतं. राजेशसोबत लग्न केलं तेव्हा डिंपल खूपच लहान होती. पण राजेश खन्नाच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर वर्षभरातच डिंपल आई झाली. कमी वयातच तिने ट्विंकल खन्ना आणि नंतर रिंकी खन्नाला जन्म दिला. मुलींची देखभाल करण्यासाठी तिने करिअरचा त्याग केला. ज्या कुटुंबासाठी तिने करिअरचा त्याग केला पुढे त्या पतीपासूनही ती वेगळी राहायला लागली. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना 1982 मध्ये वेगळे झाले.
डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना एकमेकांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्नापासून वेगळी झाल्यानंतर डिंपल कपाडियाने 1982 मध्ये सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलं. त्यानंतर ऋषी कपूर आणि कमल हासनसोबत 'सागर' चित्रपटात ती दिसून आली. बॉबी आणि सागर या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
राजेश खन्नापासून वेगळी राहत असल्याने डिंपल कपाडिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आली. सनी देओलसोबत (Sunny Deol) तिचं नाव जोडलं गेलं. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही. राजेश खन्नाने 2012 मध्ये जगाचा निरोप घेतला. राजेश खन्नादेखील कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असायचा.
वेगळं राहून घटस्फोट का घेतला नाही?
डिंपल कपाडिया म्हणाली होती,"राजेश खन्नाला चुकीचं समजलं जातं. पण खरंतर तो एक शानदार व्यक्ती आहे. वयाच्या 16 व्या वर्षी मी राजेशसोबत लग्न केलं होतं. त्यावेळी मला गोष्टी कळत नव्हत्या. 9 वर्षे आमचा संसार सुरू होता. आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो पण कायदेशीर घटस्फोट मात्र घेतला नाही. वेगळं झाल्यानंतर पुन्हा एकत्र यावं याबदद्ल आम्ही अनेकदा चर्चा केली आहे".
संबंधित बातम्या