एक्स्प्लोर

Dilip Kumar Passes Away : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखलं जात होतं.

Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

अनेक दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी 6 जून रोजी देखील दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांत जमा झालेलं पाणी काढण्यात आलं होतं. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 

बॉलिवूडचा The First Khan काळाच्या पडद्याआड

दिलीप कुमार यांचं पूर्ण नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammed Yusuf Khan) होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखलं जात होतं. हिंदी सिनेसृष्टीतील मेथड अॅक्टिंगचं क्रेडिट दिलीप कुमार यांनाच देण्यात येतं. तसेच त्यांना ट्रॅजिडी किंग म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमे केले. 1944 साली प्रदर्शित करण्यात आलेला ज्वारभाटा हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर 1998 साली प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

पाहा व्हिडीओ : Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

दिलीप कुमार यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबाबत सायरा बानो यांचा खुलासा 

एका मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Shamita Shetty: '...तर एव्हाना मुलं झाली असती', वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?
'...तर एव्हाना मुलं झाली असती', वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?
Veen Doghantli Hi Tutena Purniemaa Dey: 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर; ऑनस्क्रिन नवऱ्यानं शेअर केलाय VIDEO
'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर; ऑनस्क्रिन नवऱ्यानं शेअर केलाय VIDEO
Raja Shivaji: 'राजा शिवाजी'च्या सिंहगर्जनेनं मोडले मराठी सिनेमांचे रेकॉर्ड्स, चौथ्या आठवड्यातही थिएटर फुल्ल, किती कोटी कमावले?
'राजा शिवाजी'च्या सिंहगर्जनेनं मोडले मराठी सिनेमांचे रेकॉर्ड्स, चौथ्या आठवड्यातही थिएटर फुल्ल, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
Rinku Rajguru Aakash Thosar: रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?
सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार
Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
Embed widget