Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणार
Dilip Kumar Health Update : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच, दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
![Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणार Dilip Kumar Health Dilip Kumar Update admitted to hospital due to age related issues know his health update Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2021/03/06142954/dilip-kumar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dilip Kumar Health Update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील सुत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, आता दिलीप कुमार यांची प्रकृती पहिल्यापेक्षा उत्तम आहे." मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण तरिदेखील त्यांना कमीत कमी 3 दिवसांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे, त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. सध्या दिलीप कुमार आयसीयूमध्ये आहेत.
दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबई खार येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दिलीप कुमार यांच्या कौटुंबिक सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, "दिलीप कुमार यांचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे. त्यांचं वाढलेलं वय आणि इतर परिस्थिती पाहता, त्यांच्या तपासण्या करण्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, चिंतेचं कोणतंही कारण नसल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं."
दिलीप कुमार यांनी याच महिन्यात 6 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांत जमा झालेलं पाणी काढण्यात आलं होतं. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)