एक्स्प्लोर

Dhondi Champya - Ek Prem Katha : 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित; भरत जाधव, वैभव मांगले आणि निखिल चव्हाण प्रमुख भूमिकेत

ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ (Dhondi Champya - Ek Prem Katha) या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Dhondi Champya - Ek Prem Katha: 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ (Dhondi Champya - Ek Prem Katha) या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीबरोबरच ओवी -आदित्यची प्रेमकहाणीही खुलताना दिसणार आहे. 

16 डिसेंबर रोजी चित्रपट होणार रिलीज

आपण एका मुला मुलीची प्रेम कथा तर नेहमीच बघत आलो आहे,  परंतु ही कहाणी एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी लपलेली आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले. हे दोघं एकाच गावचे असून दोघामध्ये कसलं तरी शत्रुत्व असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचे   खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 16 डिसेंबर सिनेमा गृहात जाऊन चित्रपट बघावा लागेल.  

दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांनी दिली माहिती 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, "प्रेक्षकांना विनोदी चित्रपट आवडतात. ही एक धमाकेदार कहाणी आहे. निव्वळ मनोरंजन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासोबत पाहावा असा आहे. धोंडी आणि चंप्याला एकत्र आणताना उडणारी धमाल यात पाहायला मिळणार असून प्रेमकथा आणि विनोद हे दोन्ही जॉनर अनुभवायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले हे हास्यसम्राट एकत्र आले आहेत.'' 

View this post on Instagram
 
A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित 'धोंडी चंप्या - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या  प्रेक्षकांना चित्रपटगृहात भेटायला येणार आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shah Rukh Khan: शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

India Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP MajhaUddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJP Nadda on RSS : जे.पी. नड्डा यांचं आरआरएसबाबत मोठं वक्तव्य! दरेकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Horror Movies : 'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Embed widget