Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र लग्न सोहळ्यात जखमी, पाठीला आणि पायला दुखापत; आता प्रकृती कशी?
Dharmendra Injured : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आली आहे. मागील दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आता त्यात सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Dharmendra Injured : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत धर्मेंद्र हे खूपच थकल्यासारखे दिसत होते. त्यांच्या या फोटोमुळे चाहत्यांच्या काळजात धस्स झाले होते. आता, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आली आहे. मागील दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आता त्यात सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र नुकतेच उदयपूर येथे सनी देओल आणि बॉबी देओलसह कौटुंबिक लग्न सोहळ्याला उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात नाचत असताना तोल जाऊन धर्मेंद्र पडले आणि दुखापतग्रस्त झाले. त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. थकवा आणि वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. सूत्रानुसार आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता फोटो
धर्मेंद्र यांनी मध्यरात्रीच्या सुमारास क्लिक केलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला. विस्कटलेले केस आणि थकलेल्या चेहऱ्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली होती. या फोटोसह धर्मेंद्र यांनी कॅप्शन देत लिहिले होते की, आता मध्यरात्री झोप येत नाही, भूक लागते. शिळ्या चपातीसह लोणी हे चविष्ट लागते. मात्र, काही वेळानंतर धर्मेंद्र यांनी ही पोस्ट डिलीट केली.
88 व्या वर्षी चित्रपटात केला अभिनय
88 वर्षीय धर्मेंद्र हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात झळकले होते. यामध्ये शाहीद कपूर आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होते. याआधी ते करण जोहरच्या जुलै 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसला होते. धर्मेंद्र आता श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्किस' चित्रपटात दिसणार आहे.