एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Delivery Boy : कॉमेडी, इमोशन्स आणि एंटरटेनमेंटचं फॅमिली पॅकेज संपूर्ण महाराष्ट्रात होणार डिलिव्हर! 'डिलिव्हरी बॉय'चा धमाकेदार ट्रेलर आऊट

Delivery Boy : 'डिलिव्हरी बॉय' या आगामी मराठी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कॉमेडी, इमोशन्स आणि एंटरटेनमेंटचं फॅमिली पॅकेज असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

Delivery Boy Trailer Out : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy) या आगामी मराठी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कॉमेडी, इमोशन्स आणि एंटरटेनमेंटचं फॅमिली पॅकेज असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

'डिलिव्हरी बॉय'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलर लॉन्चला साजरे झाले 'डोहाळे जेवण'

'डिलिव्हरी बॉय' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला आहे. यावेळी चित्रपटातील आठ गर्भवतींच्या 'डोहाळे जेवणाचा'चा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. अतिशय पारंपरिक आणि राजेशाही थाटात या डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला.

View this post on Instagram
 
A post shared by Delivery Boy - डिलिव्हरी बॉय Film (@deliveryboythefilm)

तगडी स्टारकास्ट असणारा 'डिलिव्हरी बॉय'

मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलर लॉन्च सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बाझमी, मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवून ठेवली होती त्यातच आता 'डिलिव्हरी बॉय'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.

'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? 

'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलरमध्ये अंकिताला गावात एक फर्टिलिटी सेंटर काढायचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला इस्टेट एजंट असलेला प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मदत करताना दिसत आहेत. परंतु हे करताना त्यांना अनेक जुगाड करावे लागत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार की त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'डिलिव्हरी बॉय' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात,"सरोगसीबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमजुती आहेत, अनेक ठिकाणी आजही जुनीच विचारसरणी घेऊन लोक जगत आहेत आणि हीच विचारसरणी बदलण्याचा आम्ही या चित्रपटातून प्रयत्न केला आहे. खरंतर सरोगसी हा खूप नाजूक विषय आहे, मात्र त्याचे गांभीर्य जाऊ न देता मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही 'डिलिव्हरी बॉय'मधून केला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने आम्ही हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. ही कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा".

संबंधित बातम्या

Delivery Boy Poster out : प्रथमेश परब घेऊन येतोय एंटरटेनमेंटची डिलिव्हरी; 'डिलिव्हरी बॉय'च्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC on Sunetra Pawar : बहिणीने पत्नीला हरवलं, अजितदादांची पहिली प्रतिक्रिया!ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 10 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Setback Special Report : अजित पवार यांचे आमदार फुटणार? राज्यात परिस्थिती काय?Maharashtra Congress Special Report : काँग्रेसला हवं झुकतं माप, मविआत वाढणार ताप? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget