Deepika Padukone: बेशरम रंग ते शाहरुखसोबत काम करताना आलेला अनुभव; पठाणबाबत भरभरुन बोलली दीपिका
एका मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) पठाण (Pathaan) संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिच्या या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.
Deepika Padukone: पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या शाहरुख हा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणनं पठाण संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिच्या या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.
यशराज फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिका पठाण चित्रपटाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे.
पठाणमध्ये शाहरुखसोबत पुन्हा स्क्रिन शेअर करताना कसं वाटलं?
असा प्रश्न विचारल्यानंतर दीपिकानं उत्तर दिलं, 'मला त्याच्याबद्दल जे वाटतं हे मी शब्दात सांगू शकत नाही. आमच्या दोघांच्या नात्यामध्ये भावना, प्रेम हे सर्व काही आहे. आम्ही खूप चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.'
पठाणमधील कोणते गाणं आवडते?
असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. या प्रश्नाला दीपिकानं उत्तर दिलं, 'दोन्ही गाणी मला आवडतात. या गाण्यांमधील एक गाणं निवडणं अवघड आहे. बेशरम रंग ज्या ठिकाणी आम्ही शूट केलं तिथे खूप थंडी होती. कठीण परिस्थितीमध्ये आम्ही शूटिंग केलं. मला चित्रपटातील दोन्ही गाण्यांचे शूटिंग करताना मजा आली. दोन्ही गाणी हिट झाली आहेत.'
'पठाण हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल आहे सिद्धार्थसोबतचा हा माझा दुसरा चित्रपट आहे. स्पाय, थ्रिलर अॅक्शन असणारा असा चित्रपट मी पहिल्यांदाच केला. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खास होता. शाहरुख मला सांगतो की, ज्यांच्यासोबत तुमचा वेळ चांगला जातो, त्या लोकांसोबत काम केलं पाहिजे. मी तेच या चित्रपटात केला. ज्यामुळेच या चित्रपटाला यश मिळेल.' असंही दीपिकानं या मुलाखतीमघ्ये सांगितलं.
पाहा व्हिडीओ:
She is a total femme fatale in #Pathaan as she transforms into a spy with a license to kill! Watch @deepikapadukone bare her heart about her role, what makes her and @iamsrk one of the biggest all-time blockbuster jodis of the Indian film industry & much more... pic.twitter.com/d4hEHccZbq
— Yash Raj Films (@yrf) January 23, 2023
दीपिका आणि शाहरुख यांच्यासोबतच जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा हे कलाकार देखील पठाणमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: