दीपिका पदुकोणने वयाच्या 12 व्या वर्षी लिहिली पहिली कविता
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) तिचे आणखी एक टॅलेंट चाहत्यांना दाखवून दिले आहे. हे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. दीपिका पदुकोणलाही लेखनाची आवड आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती एक उत्तम अभिनेत्री सोबत बॅडमिंटन चॅम्प देखील आहे. यावेळी दीपिकाने तिचे आणखी एक टॅलेंट चाहत्यांना दाखवून दिले आहे. हे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. दीपिका पदुकोणलाही लेखनाची आवड आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिने वयाच्या 12 व्या वर्षी एक कविता लिहिली. त्याबद्दल तिने आज सोशल मीडियावर ही कविता शेअर केली आहे.
दीपिका पदुकोणने इयत्ता सातवीत असताना पहिल्यांदा कविता लिहिली. त्यावेळी ती 12 वर्षांची होती. दीपिकाच्या या कवितेचे नाव I Am असे आहे. तिने ती पहिली आणि शेवटची कविता लिहिली. ती कविता आज तिने चाहत्यांसाठी शेअर केली आहे. दीपिकाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
पोस्ट शेअर करताना दीपिका पदुकोणने लिहिले आहे की, कविता लिहिण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न. ती मी सातवीत असताना लिहिली असून त्यावेळी मी 12 वर्षांची होते.
View this post on Instagram
दीपिकाच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, तू 36 वर्षांची आहेस परंतु अजूनही लहान मुलासारखी आहेस. प्रेम आणि काळजीची आवश्यकता आहे. दरम्यान, दीपिकाने वयाच्या 12 व्या वर्षी कविता लिहिल्याचे पाहून दुसऱ्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. दीपिकाच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले आहे.
दीपिका पदुकोण शेवटची घिरियांमध्ये अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवासोबत दिसली होती. घिरिया ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याआधी ती रणवीर सिंगसोबत 83 या चित्रपटात दिसली होती. तिने कपिल देव यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारली होती.