Deepika Padukone : दीपिकाने गरोदरपणात शेअर केली 'ती' पोस्ट; चाहत्यांनी विचारले,"सर्व ठीक आहे ना?"
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. प्रेग्नंसीदरम्यान अभिनेत्रीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून चाहत्यांना सर्व काही ठीक आहे ना?, असा प्रश्न पडला आहे.

Deepika Padukone Cryptic Post : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. अभिनेत्रीची सध्या प्रेग्नंसीची सेकंड टर्म सुरू आहे. (तिसरा महिना संपूण चौथा महिना सुरू झाला आहे) अभिनेत्री सध्या मीडियापासून दूर असून आपली प्रेग्नंसी स्टेज एन्जॉय करताना दिसत आहे. अभिनेत्री सध्या इंस्टाग्रामवर जास्त सक्रीयदेखील नाही. अशातच आता अभिनेत्रीने इंस्टास्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या या क्रिप्टक पोस्टने चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
दीपिका पादुकोणची पोस्ट काय? (Deepika Padukone Post)
दीपिका पादुकोणने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"कमी पोस्ट करत आहे आणि काम जास्त करत आहे. तुलना कमी आणि शिकण्याचा प्रयत्न जास्त करत आहे. तक्रार कमी आणि प्रार्थना जास्त करत आहे. कमी बोलतेय आणि काम जास्तीत जास्त करण्यावर भर आहे". दीपिका पादुकोणची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती नक्की कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सर्व काही ठिक आहे ना?, असं चाहते दीपिकाला विचारत आहेत.

दीपिकाला 'या' महिन्यात होणार बाळ
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये स्टार कपलने खुलासा केला आहे की,"सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे". या पोस्टनंतर सिनेसृष्टीतील मंडळींसह चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
दीपिका पादुकोण 'या' चित्रपटांमध्ये व्यस्त
दीपिका पादुकोण सध्या एका ब्रेकवर आहे. दीपिकाचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दणदणीत कमाई केली. गतवर्षात दीपिकाचे 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दीपिकाचा अजय देवगन स्टारर 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अजय देवगनच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातही अभिनेत्री झळकणार आहे. दीपिकाच्या आगामी चित्रपटांसाठी चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर दीपिका आणि रणवीर लग्नबंधनात अडकले. पद्मावत, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला: रामलीला, 83, सर्कस अशा अनेक चित्रपटांत रणवीर आणि दीपिका एकत्र दिसून आले आहेत.
संबंधित बातम्या























