Black Beauty Deepika Padukone : इंडियनपासून वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत 'या' रंगात बॅालिवूडमधील मस्तानीचं खुलतं सौंदर्य
दीपिका पादुकोण म्हणजेच, बॉलिवूडची मस्तानी. दीपिका आपल्या सौंदर्यासोबतच आपल्या ट्रेन्डी आउटफिट्सही ओळखली जाते. पाहुयात तिचे काही क्लासी आउटफिट्स...
Deepika Padukone : बॅालिवूडच्या टॅाप 10 मध्ये समावेश होणारी आणि तिच्या अभिनयाने, सौंदर्याने लाखो चाहत्यांची मनं जिंकून घेणारी दिपीका पादुकोण म्हणजेच बॅालिवूड दुनियेतील मस्तानी. दीपिका तिच्या लूकमुळे आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिका नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी ऑउटफिट्सची निवड करताना दिसते. सोशल मिडीयावर तिचे चाहते तिच्या नवनवीन फोटोजची आतुरतेनं वाट पाहत असतात. तसं पाहायला गेलं तर दीपिकाचं सौंदर्य कोणत्याही रंगाच्या कपड्यांमध्ये खुलून दिसतं, पण काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दीपिका क्लासी दिसते. दीपिकाच्या बॉर्डरोबमध्ये इतर रंगाच्या तुलेनेत काळ्या रंगाचा समावेश अधिक दिसतो. अशातच आउटफिट वेस्टन असो वा इंडियन, ब्लॅक कलर आणि दीपिका हे समीकरण खरंच जुळून येतं.
सभ्यसाची हे इंडियन आउटफिटसाठी म्हणून ओळखले जाते.सभ्यसाची क्रियेशनमधील लेहंगा-चोळी प्रकारातील परिधान केलेल्या काळ्या रंगाचा स्कर्ट, लांब हाताचा ब्लाउज या लूकमध्ये दिपीका मनमोहक दिसतेय. त्यावर शोभेल अशी सुंदर नक्षीकाम केलेली ओढणीही तिनं परिधान केली आहे.
PHOTO : ऐश्वर्या रायपासून दीपिका पादुकोणपर्यंत या अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून बसेल धक्का
View this post on Instagram
आता दीपिकाचा हा फोटो पाहा. या आउटफिटमध्ये दीपिकाच्या सौंदर्याची बातच न्यारी... दीपिकानं यात निऑन हिरवा रंग आणि ब्लॅक नेट याचं कॉम्पिनेशन असणारा गाउन वेअर केला आहे. शिवाय त्या ड्रेसला शोभेल अशी काळ्या रंगाची पर्सही तिनं कॅरी केली आहे.
View this post on Instagram
दीपिकाचा हा लूक सर्वात वेगळा आणि हटके आहे. तिनं ब्लॅक पॅन्टसूट वेअर केला आहे. त्यासोबत तिनं हूड कॅरी केला होता. यामुळे तिचा लूक आणखी सुंदर दिसतोय. अशातच न्यूड मेकअप, काळ्या रंगाचीच हिलची सॅन्डल यासह तिनं आपला लूक कम्प्लिट केला आहे.
View this post on Instagram