Aryan Khan Bail Rejected: ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचा जामीन फेटाळला
Aryan Khan Bail Rejected: आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याच्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती.
Aryan Khan Bail Hearing: क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबईतील फोर्ट कोर्टात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
आर्यन गुरुवारी रात्री एनसीबीच्या कार्यालयात थांबला
न्यायालयाने म्हटले की कोविड अहवालाशिवाय आरोपींना तुरुंगात नेले जात नाही, त्यामुळे सर्वांना गुरुवारी रात्री NCB कार्यालयात राहावे लागेल. जे आरोपीच्या वकिलांनी मान्य केले. कोर्टात सुनावणीदरम्यान, एनसीबीने आरोपीच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने त्याला परवानगी दिली नाही.
Mumbai's Esplanade Court begins hearing on bail pleas of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha in the cruise ship drug case
— ANI (@ANI) October 8, 2021
आर्यन खानचे वकील कोर्टात काय म्हणाले?
गुरुवारी रिमांड वाढवण्याच्या एनसीबीच्या विनंतीला विरोध करताना आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, त्याच्या क्लायंटचा इतर कोणत्याही आरोपीशी संबंध नाही. आर्यन 'VVIP Guest' म्हणून क्रूझवर होता आणि 'बॉलिवूडशी संबंधित व्यक्तीला क्रूझमध्ये ग्लॅमर जोडायचे होते आणि त्यामुळे आर्यनला आमंत्रित करण्यात आले होते' असा दावा वकीलाने केला.
'क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक भाजप नेत्याचा मेहुणा', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप
वकील मनेशिंदे म्हणाले, "मी (आर्यन) क्रूझवरील इतर कोणत्याही व्यक्ती किंवा अटक केलेल्या आरोपींशी कोणत्याही प्रकारे जोडलेला नाही. आयोजकांशी किंवा इतर अटक आरोपींशी माझा संबंध नाही. मात्र, त्याने कबूल केले की आर्यन अरबाज मर्चंटला ओळखतो.
वकील म्हणाले, 'तो (मर्चंट) माझा मित्र आहे, मी ते नाकारत नाही. पण केवळ एका व्यक्तीशी संबंध असणे मला कोठडीत ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत.
कधी झाली अटक?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.