Corona Papers Twitter review: कसा आहे प्रियदर्शन यांचा 'कोरोना पेपर्स'? नेटकरी म्हणतात...
‘कोरोना पेपर्स’ (Corona Papers) या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे
Corona Papers Twitter review: प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन (priyadarshan) यांनी ‘कुंजली मारकर’ या चित्रपटाच्या अपयशानंतर ‘कोरोना पेपर्स’ (Corona Papers) या चित्रपटामधून कमबॅक केलं आहे. ‘कोरोना पेपर्स’ हा चित्रपट काल (6 एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे तर काहींनी या चित्रपटाचं डबिंग व्यवस्थित झालं नाही, असं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणलं आहे.
एका नेटकऱ्यानं ट्विटरवर कोरोना पेपर्स या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'एक उत्तम थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाचा मुख्य ड्रॉ-बॅक डबिंग आणि काही सिन्समधील काही कलाकारांचा अभिनय हा आहे. चित्रपटाचा फर्स्ट हाफ ठीक होता पण दुसरा हाफ चांगला आहे .एकूणच हा एक डिसेंट थ्रिलर चित्रपट आहे.'
#Coronapapers
— WASIM SIDAN (@sidan_wasim) April 6, 2023
A fine thriller
The main drawbacks of the film is dubbing and some actors performance at some scenes
First half was ok but second half👌
Other than this movie is a decent watch#Shanenigam and #Siddique was good
Rest others are also fine
Overall a decent thriller
एका युझरनं ट्वीट शेअर करत लिहिलं, ' हा एक डिसेंट चित्रपट आहे. शेन निगम यानं कोरोना पेपर्स या चित्रपटात चांगलं काम केलं आहे. तुमच्याकडे भरपूर मोकळा वेळ आणि पैसा असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.'
#CoronaPapers
— Unbiased Malayalam Reviews (@review_unbaised) April 6, 2023
A decent film which offers nothing else apart from being watchable.
Good performance by #ShaneNigam
Felt like #SandhyaShetty is not convincing with poor dubbing.
Watch if you got lots of free time and money.
🌕🌕🌖🌑🌑 pic.twitter.com/U6Bx4LmO7T
शाईन टॉम चाको (Shine Tom Chacko), सिद्दीक (Siddique), शेन निगम (Shane Nigam) आणि हन्ना रेजी कोशी (Hannah Reji Koshy) या कलाकरांनी ‘कोरोना पेपर्स’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. कोरोना पेपर्स हा चित्रपट 8 थोटकल या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी, म्हणजेच 6 एप्रिलला केरळ बॉक्स ऑफिसवर 7.5 लाखांची कमाई केली.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: