Cinema Lovers Day: सिनेप्रेमींसाठी खुशखबर! 'सिनेमा लव्हर्स डे' निमित्त खास ऑफर; 'या' दिवशी 99 रुपयात पाहू शकता चित्रपट
पीव्हीआर सिनेमाज, आइनॉक्स आणि सिनेपोलिस या मल्टीप्लेक्स चेन्सनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'सिनेमा लव्हर्स डे' (Cinema Lovers Day) ची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
Cinema Lovers Day : प्रेक्षकांना चित्रपट (Movie) थिएटर्समध्ये जाऊन बघायला आवडतात. अनेक वेळा लोक तिकीटाची किंमत जास्त असल्याने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाहीत. 'सिनेमा लव्हर्स डे' निमित्त सिनेप्रेमींना खास ऑफर देण्यात आली आहे. आता शुक्रवारी (20 जानेवारी) 'सिनेमा लव्हर्स डे' (Cinema Lovers Day) साजरा केला जाणार आहे. या दिवशी सिनेप्रेमींना 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. काही मल्टीप्लेक्स चेन्सने 20 जानेवारीला 'सिनेमा लव्हर्स डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पीव्हीआर सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या मल्टीप्लेक्स चेन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'सिनेमा लव्हर्स डे'ची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
काय आहे ऑफर आणि कोणत्या शहरांमध्ये लागू?
99 रुपयांची ऑफर रिक्लिनर्स, IMAX, 4DX या फॉरमॅटवर लागू होणार नाही. तसेच 99 रुपये ही किंमत जीएस्टी सोडून आहे. तसेच, ही ऑफर फक्त 20 जानेवारी या दिवशीच उपलब्ध आहे. ही ऑफर निवडक शहरांमध्येच दिली जाईल असेही सांगण्यात आले आहे. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये 100 रुपये प्लस जीएसटीसह तिकिटे उपलब्ध असतील. तर, तेलंगणामध्ये 112 रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल. ही ऑफर आपल्या शहरात आहे की नाही ते तुम्ही पीवीआर सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपोलिस यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करु शकता.
We are celebrating the magic of movies at a magical price for #CinemaLoversDay! Watch movies at #PVR for just ₹99 on 20th Jan'23.
— P V R C i n e m a s (@_PVRCinemas) January 17, 2023
Applicable for any movie, any show; so book your tickets ASAP!
Book your tickets now: https://t.co/TGQXYwiL22#MoviesAt99 #CinemaLovers #Offer pic.twitter.com/f6MVphkVnT
बुक माय शो वेबसाईटनुसार, जर तुम्ही दिल्लीत 20 जानेवारीचे तिकीट बुक केले तर प्राईम सीट श्रेणीतील तिकिटाची किंमत 121.42 रुपये आहे. यामध्ये 22.42 रुपये सुविधा शुल्क आहे. या फीमध्ये 18% GST देखील समाविष्ट आहे. तसेच मुंबई जीएसटीसह, एका तिकिटाची किंमत 110.68 रुपये होत आहे.
पाहू शकता हे चित्रपट
अवतार 2, कुत्ते, दृश्यम 2, वेड, वारिसु हिंदी, वाल्टेयर वीरय्या हिंदी, द कश्मीर फाइल्स, भेडिया, ऊंचाई हे चित्रपट तुम्ही 99 रुपयांच्या ऑफरमध्ये पाहू शकता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: