Supreme Court : चित्रपटगृहात प्रेक्षक खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
चित्रपटगृहात प्रेक्षक खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकतात की नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे.
Supreme Court : चित्रपट (Movie) पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपगृहात (Movie Theater) जातात. चित्रपगृहात चित्रपट बघताना पॉपकॉर्न (Popcorn), समोसा असे खाद्य पदार्थ लोक खातात. याच खाद्य पदार्थांसंबंधित एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) खंडपीठाने 3 जानेवारी रोजी नमूद केले की, 'सिनेमा हॉल ही थिएटर मालकांची मालमत्ता आहे. त्यामुळे चित्रपट बघायला जाताना प्रेक्षक अन्न आणि पेय थिएटरमध्ये घेऊन जाऊ शकतात की नाही? याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे.'
जम्मू-काश्मीरमधील सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स मालकांनी केली याचिका
जम्मू-काश्मीरमधील सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्सच्या (Multiplex) मालकांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली. याचिकाकर्त्यांनी 2018 मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने सिनेमागृहात येणारे लोक बाहेरून खाद्यपदार्थ आणू शकतात, असा आदेश दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा तो निर्णय रद्द केला.
न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांनी सांगितले की, "थिएटरच्या मालकांना थिएटरमध्ये अन्न आणि पेये विकण्याचा अधिकार आहे."
'सिनेमा हॉलची मालमत्ता ही थिएटरच्या मालकाची खाजगी मालमत्ता आहे. जोपर्यंत त्यांचे नियम सार्वजनिक हित, सुरक्षितता आणि कल्याणाच्या विरुद्ध नसतील तोपर्यंत थिएटर मालकांच्या नियमांचा विरोध केला जाऊ शकत नाही. थिएटर मालकाला अन्न आणि पेये यांच्या विक्रीसंबंधित कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. चित्रपट पाहणाऱ्याला ते खरेदी न करण्याचा पर्याय आहे.' असंही कोर्टानं म्हटलं.
Popcorn Goes Cold: SC says cinema owners can probihit outside food in halls
— ANI Digital (@ani_digital) January 3, 2023
Read @ANI Story | https://t.co/NoBGBJ5x69#SupremeCourt #CinemaOwners #OutsideFood pic.twitter.com/zzJXs9UaMB
चित्रपटगृह मालकांना सर्व प्रेक्षकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा देण्याचे निर्देश दिले. लहान मुले आणि मुलांसह पालकांना थिएटरमध्ये वाजवी प्रमाणात अन्न घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, असंही खंडपीठाने सांगितले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: