Chunky Panday : 'माझ्यापेक्षा ती जास्त कमावते त्यामुळे...', लेकीच्या डेटींग चर्चांवर चंकी पांडें झाले व्यक्त
Chunky Panday on Ananya-Aditya Relationship : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता यावर चंकी पांडेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
![Chunky Panday : 'माझ्यापेक्षा ती जास्त कमावते त्यामुळे...', लेकीच्या डेटींग चर्चांवर चंकी पांडें झाले व्यक्त Chunky Panday reaction on Daughter Ananya Panday and Aditya Roy Kapur Relationship Entertainment Bollywood latest update detail marathi news Chunky Panday : 'माझ्यापेक्षा ती जास्त कमावते त्यामुळे...', लेकीच्या डेटींग चर्चांवर चंकी पांडें झाले व्यक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/34bfc7235c73655b09b6e8e29f1ae6ad1713841079144720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chunky Panday on Ananya-Aditya Relationship : चंकी पांडे (Chunky Panday) यांची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिचं नाव मागील अनेक दिवासांपासून आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapur) जोडलं जात आहे. असं म्हटलं जातंय की, ही 25 वर्षीय अभिनेत्री 38 वर्षीय अभिनेता आदित्य रॉय कपूरला सध्या डेट करत आहे. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट झालेत. कधी डेटवर गेल्याच्या तर कधी एकत्र सुट्टीवर गेल्याच्या पोस्टनी या चर्चांना आणखी दुजोरा दिला.
या सगळ्याच्या दरम्यान अनन्याचे वडिल आणि अभिनेते चंकी पांडे यांनी नुकतच लेकीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. सध्या वडिलांनी दिलेल्या या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच यामुळे अनन्या आणि आदित्यच्या अफेअरच्या चर्चांना देखील दुजोरा मिळत असल्याचं म्हटलं जातंय.
चंकी पांडेंनी काय म्हटलं?
वेब पोर्टल लहरेंसोबत संवाद साधताना चंकी पांडे यांनी यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना अनन्याच्या रिलेशनशिपविषयी विचारण्यात आलं. तसेच अनन्याने अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये आदित्यचा उल्लेख केला असल्याबाबतही चंकी पांडे यांना विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी म्हटलं की, माझ्या मते हे योग्य आहे. ती सध्या 25 वर्षांची आहे आणि माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवते. त्यामुळे ती तिच्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यास स्वतंत्र्य आहे. मी माझ्या 25 वर्षांच्या मुलीला काय करावं हे सागंण्याची हिंमत कशी करु शकतो.
मला याबद्दल कोणताही अडचणी नाही - चंकी पांडे
तसेच यावेळी अनन्या पांडेच्या इंटिमेट सीन्सवरही चंकी पांडे यांनी भाष्य केलं आहे. यावर चंकी पांडे यांना विचारण्यात आलं की, अनन्याच्या इंटिमेट सीन्सबद्दल तुम्हाला काही आक्षेप आहे का? यावर त्यांनी म्हटलं की, मला याबद्दल कोणताही अडचण नाही. मी हॉलीवूडमध्ये हे होताना पाहिलंय आणि यामध्ये काहीही नुकसान नाहीये. तुम्हाला हे स्वीकारावंच लागेल. तसेच यावेळी त्यांच्या मुली अजूनही त्यांच्याकडे सल्ले घेण्यासाठी येतात असाही उल्लेख त्यांनी केला.
माझ्या मुली आईच्या जास्त जवळ - चंकी पांडे
पुढे बोलताना चंकी पांडे यांनी म्हटलं की, माझ्या दोन्ही मुली त्यांच्या आईच्या म्हणजेच भावनाच्या जास्त जवळ आहेत. त्यांना काही हवं असल्यास ते मला कॉल करतात. पण याशिवया त्या त्यांच्या आईला नेहमी कॉल करतात. पण जेव्हा त्यांना कोणताही सल्ला हवा असतो तेव्हा मी त्यांची नक्की मदत करतो. अनेकदा चित्रपटांची निवड करण्यावरुन आमच्यामध्ये बरेच वादही होतात, असाही खुलासा यावेळी चंकी पांडे यांनी केला आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)