Chiranjeevi Net Worth : प्रायव्हेट जेट, आलिशान घर अन् महागड्या गाड्या; 'असं' लक्झरी आयुष्य जगतायत मेगास्टार चिरंजीवी
Chiranjeevi : तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी हे गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. अनेक यशस्वी प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांच्या नेटवर्थमध्येही वाढ होत आहे. मेगास्टारची एकूण संपत्ती 1650 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
Chiranjeevi Net Worth : बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. या कलाकारांच्या यादीत तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा समावेश होतो. चिरंजीवी यांची एकूण संपत्ती 1650 कोटी रुपयांच्या आसपास आहे. चिरंजीवी लक्झरी आयुष्य जगत आहेत. अभिनेता चिरंजीवी राजकारणातदेखील सक्रीय आहे. आजवर अनेक भूमिका त्यांनी चोख निभावल्या आहेत. तेलुगू सिनेसृष्टीतील सर्वात प्रभावशाली असणारा चिरंजीवी गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मेगास्टार दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
जीक्यू 2022 च्या रिपोर्टनुसार, चिरंजीवीची एकूण संपत्ती 1650 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अभिनय, जाहिरात, उद्योग, इनवेस्टमेंटसह विविध गोष्टींच्या माध्यमातून चिरंजीवी चांगलीच कमाई करतो. तेलुगू सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये चिरंजीवींचा समावेश होतो. चिरंजीवी यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
मेगास्टारची प्रॉपर्टी किती? (Chiranjeevi Properties)
सुपरस्टार चिरंजीवी यांचा जुबली हिल्स, हैदराबाद येथे एक लक्झरी बंगला आहे. या बंगल्याची किंमत 28 कोटी रुपये आहे. बंगळुरूमध्येही त्याची आलिशान प्रॉपर्टी आहे. चिरंजीवी यांना आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. शानदार सेडानपासून असाधारण एसयूवीपर्यंत अनेक कारचं त्यांच्याकडे कलेक्शन आहे.
View this post on Instagram
'Bollywood Shaadis'च्या रिपोर्टनुसार, चिरंजीवी यांच्याकडे रोल्स रॉयस फँटम आहे. याची किंमत 9 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यांच्या शानदार कार कलेक्शनमध्ये 1.2 कोटी रुपयांची रेंज रोवर वोग, 90 लाख रुपयांची टोयोटा लँड क्रूजर, 2.5 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंज एएजी क्लासचा समावेश आहे. सियासतच्या रिपोर्टनुसार, चिरंजीवी यांच्याकडे एक मिलियन डॉलरची प्रायव्हेट जेटदेखील आहे.
'या' चित्रपटात झळकणार चिरंजीवी (Chiranjeevi Upcoming Movie)
चिरंजीवी 'विश्वंभरा' या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. 2025 मध्ये हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. चिरंजीवी यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. इंद्रा-द टायगर, आदमी और अप्सरा, द जेंटलमॅन, प्रतिबंध, आज का गूंडाराज या चित्रपटांचा यात समावेश आहे. चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह चिरंजीवी यांनी बॉलिवूडदेखील गाजवलं आहे. चिरंजीवी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.
संबंधित बातम्या