Chandigarh Kare Aashiqui on OTT : आयुष्मान खुरानाचा 'चंदीगड करे आशिकी' आता प्रेक्षकांना पाहता येणार नेटफ्लिक्सवर
Chandigarh Kare Aashiqui : आयुष्मान खुराना आणि वाणी कपूरचा 'चंदीगड करे आशिकी' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
Chandigarh Kare Aashiqui on Netflix : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) चा 'चंदीगड करे आशिकी' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सने शुक्रवारी 'चंडीगढ करे आशिकी' स्ट्रीम केला आहे. हा सिनेमा 10 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
नेटफ्लिक्सने 'चंदीगड करे आशिकी' सिनेमाची पोस्ट शेअर केल्याने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करू शकला नाही. सिनेमा प्रदर्शित होऊन 4 आठवडे झाल्यानंतर आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आयुष्मान आणि वाणीचे प्रेमप्रकरण नक्की काय आहे? ते दोघे नक्की एकमेकांच्या प्रेमात पडतात का? हे सिनेमात अतिशय विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
View this post on Instagram
सिनेमाची कथा
चित्रपटाची कथा मनविंदर उर्फ मनू (आयुष्मान खुराना) पासून सुरू होते. जो फिटनेस फ्रीक आहे. तो एका जिमचा मालक आहे आणि एक वर्षात बॉडीबिल्डर बनण्याची तयारी करत आहे. बॉडीबिल्डर बनण्यासाठी मनू रात्रंदिवस घाम गाळतो. यासोबतच जिमचा व्यवसायही नीट न चालल्यामुळे तो अडचणीत आला आहे. दरम्यान, मानवी ब्रार (वाणी कपूर) त्याच्या आयुष्यात प्रवेश करते. सुंदर असण्यासोबतच मानवी फिटनेस फ्रीक देखील आहे. हे सर्व पाहून मनू तिच्या प्रेमात पडतो. पण मानवीच्या आयुष्यात फक्त सौंदर्यापेक्षा बरेच काही आहे आणि इथेच तुम्हाला कथेतील ट्विस्ट पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या
Allu Arjun Upcoming Movies : अल्लू अर्जुनचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित, 'पुष्पा'चा दुसरा भाग वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला
Mahesh Manjrekar Movie : महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' येत्या शुक्रवारी सिनेमागृहांत प्रदर्शित
Nafisa Ali Tests Positive : अभिनेत्री नफिसा अलीला कोरोनाची लागण, गोव्यातील रुग्णालयात दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha