एक्स्प्लोर

Nafisa Ali Tests Positive : अभिनेत्री नफिसा अलीला कोरोनाची लागण, गोव्यातील रुग्णालयात दाखल

Nafisa Ali Tests Positive : बॉलिवूड अभिनेत्री नफिसा अलीला कोरोनाची लागण झाली असून सध्या तिच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nafisa Ali Tests Positive : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता या यादीत अभिनेत्री नफिसा अलीचे (Nafisa Ali) नावदेखील सामील झाले आहे. 

64 वर्षीय नफिसा अली यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली असून आता त्यांना गोव्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नफिसा त्यांच्या प्रकृतीबद्दल म्हणाल्या, "काल मला खूप ताप आला होता आणि माझी ऑक्सिजनची पातळीही खूप कमी झाली होती, पण आता माझी तब्येत ठीक आहे". 

नफिसा अलीने 'जुनून' (1979), 'टेरर' (1996), 'मेजर साब' (1998), 'ये जिंदगी का सफर' (2001), मलयालम सिनेमा 'बिग बी' (2007), 'लाइफ इन ने मेट्रो' (2008), 'गुजारिश' (2010), पंजाबी सिनेमा 'लाहौर' (2010), 'यमला पगला दीवाना' (2011), 'साहेब बीवी और गैंगस्टर 3' (2018) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी नफिसा अलीने 1976 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याआधी नफिसा अलीची राष्ट्रीय जलतरण चॅम्पियन म्हणून ओळख होती.

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल तसेच अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकता कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली असून आता त्याच्या मुलाला आणि पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर तसेच प्रियदर्शनलादेखील कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

संबंधित बातम्या

Allu Arjun Upcoming Movies : अल्लू अर्जुनचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित, 'पुष्पा'चा दुसरा भाग वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला

Bade Miyan Chote Miyan Budget : अक्षय कुमार-टायगर श्रॉफ बनणार बडे मियाँ-छोटे मियाँ, सिनेमाचे  बजेट करेल हैराण 

Madhur Bhandarkar : दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावरून दिली माहिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget