एक्स्प्लोर

Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie : हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात

Hrithik Roshan and Jr NTR : बॉलिवूडचा अॅक्शनपट हॉलिवूडच्या तोडीचा करण्यासाठी यशराज फिल्मसने कंबर कसली आहे. यशराज फिल्मसच्या युनिर्व्हसल स्पाय सीरिजमधील 'वॉर-2' साठी आता हॉलिवूडचे नावाजलेले अॅक्शन डायरेक्टर स्पिरो रजाटोस काम करणार आहेत.

Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie : मागील काही काळात बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटाची रीघ लागली आहे. अनेक अॅक्शनपट रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.  त्यातील काही चित्रपटांना  बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाले तर काही चित्रपटांना अपयशाला सामोरे जावे लागले. बॉलिवूडचा अॅक्शनपट  हॉलिवूडच्या तोडीचा करण्यासाठी यशराज फिल्मसने (Yash Raj Flims) कंबर कसली आहे. यशराज फिल्मसच्या युनिर्व्हसल स्पाय सीरिजमधील 'वॉर-2' साठी (War 2) आता हॉलिवूडचे नावाजलेले अॅक्शन डायरेक्टर  स्पिरो रजाटोस काम करणार आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनिअर एनटीआर ( Jr NTR) एकत्रित झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी ज्युनिअर एनटीआर मुंबईत आला होता. 

वायएफआर स्पाय युनिर्व्हसचे एकामागून एक चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहेत. 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण' आणि 'टायगर 3'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता  'वॉर' चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. चित्रपटात कोणतीही उणीव राहू नये यासाठी यशराज फिल्मसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. 

स्टंट डायरेक्टर  स्पिरो रजाटोस हे कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर, कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट सोल्जर, फास्ट एक्स, एफ-9 द फास्ट सागा सारख्या ब्लॉकबस्टर अॅक्शन चित्रपटातील स्टंटसाठी ओळखले जातात. आता,  स्पिरो रजाटोस हे वॉर-2 साठी काम करणार आहेत. 

'वॉर-2' या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. वॉर-2 साठी स्पिरो रजाटोस यांनी काम सुरू केले आहे. या चित्रपटातून भारतीय सिनेप्रेक्षकांना अॅक्शनपटाचा नवा अनुभव देण्यासाठी चित्रपटाच्या टीमने कंबर कसली आहे. 

कधी रिलीज होणार चित्रपट?

वॉर-2 हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉर या चित्रपटाचा सिक्वेल आहे. वॉर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते. आता वॉर-2 हा चित्रपट पुढील वर्षी 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

YRF च्या  स्पाय युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटांची यादी 

YRF च्या स्पाय युनिव्हर्सची  सुरुवात सलमान खानच्या 'एक था टायगर' मधून झाली. त्यानंतर 'टायगर जिंदा है' आणि हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या 'पठाण'ची या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' प्रदर्शित झाला. आता या फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट 'वॉर 2' आहे. अयान मुखर् याचे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये हृतिक रोशन, जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget