(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OTT Release: दिवाळीला मनोरंजनाचा धमाका; ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट
दिवाळीला ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे, कारण काही हिट चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
Ott Release Movies: ओटीटीवरील (OTT) चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. दिवाळीला अनेकांना ऑफिसला तसेच शाळेला सुट्ट्या असतात. अशावेळी कुटुंबासोबत चित्रपट बघायला अनेकांना आवडतं. दिवाळीला ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे, कारण काही हिट चित्रपट नेटफ्लिक्स, अॅमेझन प्राइम, डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफर्मवर प्रदर्शित होणार आहेत. घरबसल्या हे चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
अम्मू (Ammu)
अम्मू हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. कल्याण सुब्रमण्यम आणि कार्तकेयन संथनम यांच्या स्टोन बेंच फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चारुकेश सेकर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट एका महिलेच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीनं प्रमुख भूमिका साकारली आहे. तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेसह तेलगू भाषेमध्ये देखील हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
बिंबिसार (Bimbisara)
झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 21 ऑक्टोबरला बिंबिसार हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात कल्याण राम, कॅथरीन ट्रेसा आणि संयुक्ता मेनन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तुम्ही हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकता.
‘कृष्ण वृंदा विहारी’ (Krishna Vrinda Vihari)
‘कृष्ण वृंदा विहारी’हा रोमँटिक कॉमेडी कथानकावर आधारित असणारा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अनिश आर कृष्णा दिग्दर्शित या चित्रपटात नागा शौर्य आणि शर्ली सेटिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
ब्रह्मास्त्र (Brahmastra)
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 23 ऑक्टोबरला हा चित्रपट डिज्नी प्लस हॉस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. आलिया आणि रणबीर यांच्यासोबतच नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांनी देखील या तित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात शाहरुख खाननं देखील एक विशेष भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
OTT This Week : ट्रिपलिंग ते '20 सेंचुरी गर्ल'; ओटीटीवर प्रदर्शित होणार धमाकेदार सिनेमे अन् सीरिज