OTT This Week : ट्रिपलिंग ते '20 सेंचुरी गर्ल'; ओटीटीवर प्रदर्शित होणार धमाकेदार सिनेमे अन् सीरिज
OTT : 'या' आठवड्यात ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.
OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील '20 सेंचुरी गर्ल', 'बिंबिसार', 'फोर मोर शॉट्स प्लीज'सारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना थरार, नाट्यसोबत विनोददेखील पाहायला मिळणार आहे.
20 सेंचुरी गर्ल
कधी होणार प्रदर्शित? 21 ऑक्टोबर
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
'20 सेंचुरी गर्ल' हा एक कोरियन ड्रामा हे. 1999 सालच्या एका घडनेवर भाष्य करणारा हा रोमॅंटिक सिनेमा आहे. हा सिनेमा 21 ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बिंबिसार
कधी होणार प्रदर्शित? 21 ऑक्टोबर
कुठे होणार प्रदर्शित? झी 5
बिंबिसार राजावर आधारित 'बिंबिसार' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मल्लीदी वशिष्ठने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 21 ऑक्टोबरला हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
फोर मोर शॉट्स प्लीज
कधी होणार प्रदर्शित? 21 ऑक्टोबर
कुठे होणार प्रदर्शित? झी 5
'फोर मोर शॉट्स प्लीज' या सीरिजने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2019 तर दुसरा सीझन 2020 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे तिसऱ्या पर्वाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता 'फोर मोर शॉट्स प्लीज 3' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
View this post on Instagram
ट्रिपलिंग सीझन 3
कधी होणार प्रदर्शित? 21 ऑक्टोबर
कुठे होणार प्रदर्शित? झी 5
'ट्रिपलिंग' पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या वेबसीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेलो रिमेंबर मी
कधी होणार प्रदर्शित? 21 ऑक्टोबर
'हेलो रिमेंबर मी' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईशा आणि पायल व्यतिरिक्त या सीरिजमध्ये सौरव चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या