एक्स्प्लोर

Boyz 4 Trailer: बॉईज आर बॅक! 'बॉईज 4' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Boyz 4 Trailer: 'बॉईज 4' चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईज सहभागी झाले आहेत.'बॉईज 4' चित्रपटाच्या भन्नाट ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Boyz 4 Trailer: बॉईज, बॉईज 2, बॉईज 3 नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला 'बॉईज 4' (Boyz 4) हा चित्रपट सज्ज झाले आहेत. नुकताच 'बॉईज 4'चा ट्रेलर लाँच सोहळा  पार पडला. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज 4' चित्रपटाची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय. 'बॉईज 4' चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत.

'बॉईज 4'  ची स्टार कास्ट

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज 4' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची ही दमदार टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित, हृषिकेश कोळी लिखित या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. एखाद्या चित्रपटाचे चार भाग येणे, असे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक 'बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ट्रेलरवरून 'बॉईज 4' ही बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसतेय. 
 
'बॉईज 4' चित्रपटाच्या ट्रेलरवरून यावेळी धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याचे दिसतेय. आता ही दोस्ती कोणत्या कारणाने तुटली, धैर्या आणि ढुंग्या लंडनमध्ये काय करणार, त्यांचे पॅचअप होणार की हे अंतर अधिकच वाढणार, कबीरच्या आयुष्यात पुन्हा ग्रेस येणार? अभिनयची नेमकी भूमिका काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

 'बॉईज 4'  या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात,'यावेळी बॉईज लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. ट्रेलर पाहून याचा अंदाज आला असेलच. खरं सांगायचे तर माझ्यासह माझ्या टीमलाही खूप उत्सुकता लागून राहिली आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि सर्वांना तो आवडतोय. हाच मुख्य हेतू होता, की प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे. 'बॉईज' चा प्रत्येक भाग बनवताना हा पहिलाच भाग आहे, अशा पद्धतीनेच चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळेच कदाचित दरवेळी तो प्रेक्षकांना भावतो. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य आहे. त्यांनी या 'बॉईज'ना भरभरून प्रेम दिले. शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरवेळी प्रमाणे हा 'बॉईज' ही एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे.'

संबंधित बातम्या:

Boyz 4 : 'बॉईज 4'चा चौपट धमाका; जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
Embed widget