एक्स्प्लोर

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, शेराला अटक

सलमानची भेट न झाल्याने फुरंगटलेल्या त्याच्या चाहत्याने सलमानच्या कर्मचाऱ्याला फोन केला. सलमानशी बोलू न दिल्यास सलमानचा जीव घेईन, अशी धमकी आरोपी शेराने दिल्याचा आरोप आहे.

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपी शेराला अटक केली आहे. योगायोग म्हणजे सलमानच्या खास मर्जीतील अंगरक्षकाचं नावही शेरा आहे. त्यामुळे सुरुवातीला शेराच्या अटकेचं वृत्त पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. सलमान खानचा चाहतावर्ग फक्त भारतच नाही, तर जगभरात पसरला आहे. सलमानचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या 'गॅलक्सी' या राहत्या घराबाहेर दिवस-रात्र तासतासभर रांगा लावून बसतात. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी शेराही अनेकवेळा गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सलमानच्या वाटेकडे डोळे लावून बसत होता. मात्र सलमानची भेट घेण्याची संधी त्याला मिळाली नाही. सलमानची भेट न झाल्याने फुरंगटलेल्या शेराने सलमानच्या कर्मचाऱ्याला फोन केला. सलमानशी बोलू न दिल्यास सलमानचा जीव घेईन, अशी धमकी शेराने दिल्याचा आरोप आहे. सलमानच्या पीएने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून आरोपीला बेड्या ठोकल्या. मुंबईतील वांद्रे कोर्टात त्याची हजेरी लावण्यात आली. सलमानशी लग्न करण्यासाठी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील 24 वर्षीय मनोरुग्ण तरुणी घरातून पळाली आणि तिने मुंबई गाठली. पोलिसांनी कुसुमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तिची रवानगी केली. काही महिन्यांपूर्वीच सलमानच्या घरी एक तरुणी तीक्ष्ण हत्यार घेऊन घुसली. इतकंच नाही तर तिने आत्महत्येची धमकीही दिली. तिने सलमान खानच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि सलमान माझा नवरा आहे, असं ओरडू लागली. काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी सलमानचा आचारी बाहेर आला, पण तोपर्यंत तरुणी गच्चीवर पोहोचली होती. प्रेम रतन धन पायो सिनेमाचं तिकीट न मिळाल्याने सलमान खानच्या एका चाहत्याने आत्महत्या केली होती. चित्रपटाचं फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट न मिळाल्याने निराश झाल्याने चाहत्याने मध्य प्रदेशातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Embed widget