Bollywood Richest Couple : बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडी, दोघांची संपत्ती पाहून तुमचे डोळे फिरतील; नाव आहे...
Bollywood Richest Couple : सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत जोडपं आहे.
Bollywood Richest Couple : हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांच्यावर फक्त बॉलिवूड नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा असतात. शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह आहे तर दुसरीकडे गौरी खान एक यशस्वी उद्योगपती आहे. मेहनतीच्या जोरावर दोघांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. आजच्या घडीला बॉलिवूडमधील श्रीमंत कपल (Bollywood Richest Couple) म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
शाहरुख आणि गौरी खान या जोडप्यांचं नेटवर्थ ऐकूण चाहत्यांचेही डोळे फिरतील. चाहते विचार करू शकत नाहीत एवढी कमाई ते करतात. विराट कोहली (Virat Kohli)-अनुष्का शर्मा (Anushka Sharma), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena kapoor) अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांनी मागे टाकलं आहे.
शाहरुख खान अन् गौरी खानचं नेटवर्थ जाणून घ्या... (Shah Rukh Khan Gauri Khan Net Worth)
शाहरुख खान आणि गौरी खान या दोघांची एकूण कमाई 983 मिलियन यूएस डॉलर्सच्या आसपास आहे. भारतीय चलनानुसार, शाहरुख-गौरीची एकूण संपत्ती 7304 कोटींच्या आसपास आहेत. एकंदरीतच सात हजार कोटींपेक्षा अधिक दोघांची संपत्ती आहे. शाहरुख खान अभिनयासह सिने-निर्मितीक्षेत्रातही सक्रीय आहे. तर दुसरीकडे गौरी खान एक यशस्वी इंटीरियर डिजायनर आहे. फक्त गौरी खानची संपत्ती 220 मिलियन डॉलरच्या आसपास आहे.
View this post on Instagram
अभिनयाव्यतिरिक्त शाहरुख काय करतो?
शाहरुख खान अभिनय आणि सिने-निर्मिती क्षेत्रात सक्रीय आहे. पण जाहिरातींच्या माध्यमातून तो चांगलीच कमाई करतो. आयपीएल स्पोर्ट्स फ्रेंचायजी कोलकाता नाईट रायडर्सदेखील त्याच्या मालकीचं आहे. किड जेनिया ब्राँडमध्येही त्याने इंवेस्टमेंट केलं आहे. रिलायन्स, जिओ, थंब्स अप, हुंडई, दुबई टूरिज्मसारख्या मोठ्या ब्रँडच्या माध्यमातून तो तगडी कमाई करतो. गौरीची स्वत:ची डिझायनिंग कंपनी आहे.
शाहरुख आणि गौरीने हिंदू रितीरिवाजानंतर मुस्लिम परंपरेनुसार लग्न केलं. तसेच कोर्टात जाऊनही त्यांनी लग्न केलं. मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करण्यासाठी गौरीने तिचं नाव 'आयेशा' ठेवलं होतं. त्यांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख 26 वर्षांचा आणि गौरी तर फक्त 21 वर्षांची होती. आर्यन, सुहाना आणि अबराम ही त्यांची तीनही मुले आता हिंदी आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांचं पालन करतात.
संबंधित बातम्या