Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Bollywood Movies Updates : प्रेक्षकांअभावी काही चित्रपटगृहे तात्काळ बंद केली जात आहेत, तर काही चित्रपटगृहांची तिकिटे 30 रुपयांना विकली जात आहेत.
![Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं Bollywood Movies release updates bollywood movies goes flop theater owner worrying Mumbai Theatre Shut Down Many Other Plans Temporary Closing Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/7830ecb881e7e1d413599daaa2e6295b1713876113009290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bollywood Movies Updates : एप्रिल महिना बॉलीवूडसाठी दुखद ठरणार असल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला 'शैतान' चित्रपट हा यंदाच्या वर्षातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. मात्र, त्याशिवाय इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीत. इतकंच नव्हे तर ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला 'मैदान' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' दोन्ही चित्रपट फारशी कमाई करू शकले नाहीत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. 'क्रू', 'स्वातंत्र्य वीर सावरकर', 'एलएसडी2', 'मडगांव एक्सप्रेस' आणि 'दो और दो प्यार'ही फ्लॉप झाले. यापैकी एकाही चित्रपटाने बंपर कमाई केली नाही. आता परिस्थिती अशी आहे की, प्रेक्षकांअभावी काही चित्रपटगृहे तात्काळ बंद केली जात आहेत, तर काही चित्रपटगृहांची तिकिटे 30 रुपयांना विकली जात आहेत.
हॉलिवूड चित्रपटांना फटका
प्रेक्षकांनी फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटांकडेही पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर' या हॉलिवूड चित्रपटाची अवस्थाही बिकट झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनादेखील कमी-अधिक प्रतिसाद आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये नवीन-जुने असे 8-9 चित्रपट उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्रपट लाखांत कमावत असताना, एक-दोन चित्रपट दररोज 1-2 कोटी रुपये कमवण्यासाठी धडपडत आहेत. प्रेक्षकांअभावी अनेक चित्रपटगृहांमध्ये शो रद्द केले जात असताना, मुंबईतील गॅलेक्सी थिएटर काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
'रुस्लान', 'श्रीकांत' आणि 'भैयाजी'कोंडी फोडणार का?
चित्रपटगृहांना या संकटातून वाचवणारा कोणताही मोठा चित्रपट सध्या प्रदर्शित झालेला दिसत नाही. आयुष शर्माचा 'रुस्लान' येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल फारशी चर्चा नाही. तर, सेन्सॉर बोर्डाने
'साबरमती रिपोर्ट'या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यास सांगितले आहे. राजकुमार रावचा 'श्रीकांत' आणि दीपक तिजोरीचा 'टिप्सी' देखील 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर 24 मे रोजी मनोज बाजपेयी 'भैय्या जी' प्रदर्शित होणार आहे.
मुंबईत गॅलेक्सी थिएटरला टाळं
मागील वर्षी देखील मे महिन्यातही अशीच परिस्थिती होती. मात्र, त्यानंतर हॉलिवूडच्या 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी', 'फास्ट एक्स' आणि 'द केरळ स्टोरी' हे चित्रपट काही प्रमाणात चालल्याने थिएटर चालकांना दिलासा मिळाला. 'बॉलीवूड हंगामा'च्या वृत्तानुसार, मुंबईतील 800 सीट असलेले गॅलेक्सी थिएटर काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे बंद ठेवण्यात आले आहे. ही थिएटर G7 मल्टिप्लेक्सचा एक भाग आहे, 'Gaiety-Galaxy' या नावाने हे थिएटर प्रसिद्ध आहे. सिंगल स्क्रीन थिएटर गेल्या शुक्रवार, 19 एप्रिलपासून बंद आहे. या सिनेमागृहात 'मैदान'चे शो सुरू होते.
थिएटर चालक झालेत हताश...
'जी 7 मल्टिप्लेक्स' आणि 'मराठा मंदिर' सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी सांगितले की, 'आम्ही काय करावे? कोणतेही चित्रपट चालत नाहीत. दोन्ही चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाले. आम्हाला धक्का बसला आहे.
थिएटर्स महिनाभर बंद राहणार का?
आणखी काही थिएटर-मल्टीप्लेक्स पुढील एक महिना बंद ठेवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. मात्र, मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद होणार नसून, काही स्क्रीन बंद ठेवण्यात येणार आहेत. एका सूत्राचा हवाला देत अहवालात पुढे असे म्हटले आहे की, 'सुरुवातीला बहुतेक चित्रपटगृहांनी तिकिटांचे दर कमी केले. पण तरीही प्रेक्षकांनी रस दाखवला नाही.
उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये 30 रुपयांना तिकीट, पण प्रेक्षकांचा प्रतिसादच नाही...
आग्रा येथील राजीव सिनेमागृहात तिकिटाचे दर 30 आणि 50 रुपये करण्यात आले आहेत. पण तरीही प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही. बिहारच्या पूर्णिया येथील 'रुपवानी' सिनेमाचे मालक विशेक चौहान म्हणतात, 'अनेक एग्जीबिटर्स फोन करून दोन महिन्यांसाठी सिनेमागृह बंद ठेवावे का, असा प्रश्न विचारत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)