(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'लोक 'माल' घेऊन डिप्रेशनचे नारे देतात'; कंगनानंतर शर्लिन चोप्राची दीपिका पादुकोनवर टीका
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने अनेकदा बॉलिवूडवर टीका केली आहे. अशातच आता कंगनापाठोपाठ अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा ड्रग्ज कनेक्शनवरून बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. आता कंगना पाठोपाठ अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडवर टीका केली आहे. दरम्यान, याआधी शर्लिनने क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्सच्या पत्नीही ड्रग्ज घेत असल्याचा दावा केला होता.
काही दिवसांपूर्वी कंगनाने 'वर्ल्ड मेंटल हेल्थ डे'च्या दिवशी आपला चित्रपट 'जजमेंटल है क्या' प्रमोट केला होता. हे ट्वीट करताना कंगनाने दीपिका पादुकोनवर निशाणाही साधला होता. आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने कंगनाला पाठिंबा दिला आहे.
क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्जचं सेवन करतात; शर्लिन चोप्राचे गंभीर आरोप
काय म्हटलं होतं कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये?
'आम्ही मेंटल हेल्थबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी जो चित्रपच बनवला होता. त्याला डिप्रेशनचं दुकान चालवणाऱ्या काही लोकांमार्फत कोर्टात खेचण्यात आलं होतं. मीडियाने बॅन केल्यानंतर आणि चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं, ज्यामुळे चित्रपटाच्या मार्केटिंगमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु, हा एक उत्तम चित्रपट आहे. जर तुम्ही आतापर्यंत हा चित्रपट पाहिला नसेल तर 'वर्ल्ड मेंटल हेल्थ डे' निमित्ताने जजमेंटल है क्या चित्रपट नक्की पाहा.'
कंगना जी,सहीं कहा आपने,ये लोग माल फूँक के डिप्रेशन के नारे लगाते हैं और देश की युवा पीढ़ी को अंधकार में ढकेलते हैं। दो वक़्त की रोटी कमाने के लिए जो मज़दूर सुबह शाम मज़दूरी करता है,क्या उसे डिप्रेशन नहीं होती है? क्या डिप्रेशन से राहत पाने के लिए हम माल का सेवन करना शुरू कर दें? https://t.co/Iu25pHDRvK
— Sherni (@SherlynChopra) October 10, 2020
कंगनाचं ट्वीट रिट्वीट करत अभिनेत्री शर्लिन चोप्राने थेट बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे. शर्लिनने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'कंगना जी, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, या व्यक्ती माल (ड्रग्ज) घेऊन डिप्रेशनचे नारे देतात आणि देशातील तरूण पिढिला अंधारात ढकलतात. दोन वेळचं अन्न कमावण्यासाठी जे मजदूर दिवसभर मजूरी करतात, त्यांना डिप्रेशन होत नाही? डिप्रेशनपासून सुटका मिळवण्यासाठी आपणही माल (ड्रग्ज) सेवन सुरु करायचं का?'
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींची एनसीबीने चौकशी केली. दीपिका आणि तिची मॅनेजर यादोघींमधील व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं होतं. ज्यामध्ये ती माल (ड्रग्ज)बाबत बोलत होती. तसेच श्रद्धा कपूरचंही सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहासोबतचं व्हॉट्सअॅप चॅठ समोर आलं होतं. ज्यामध्ये श्रद्धा कपूरने तिच्याकडे सीबीडी ऑईलची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :